मध्यप्रदेश विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सध्या जोरदार सुरू असून दोन्ही पक्ष्यांची नेतेमंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना कोणतीही कसर ठेवत नसल्याचे पाहायला मिळतंय. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना ही मंडळी आक्षेपार्ह विधानं करतानाही दिसून येत आहेत
मध्य प्रदेशचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या मंत्री इमरती देवी यांच्यावर टीका केली होती. कमलनाथ आणि इमारती देवी यांचा भरसभेत ‘आइटम’ आसा उल्लेख केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. अनेक स्तरातून टीका झाल्यानंतर कमलनाथ यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली.
माझ्या वक्तव्याचा विरोधकांनी वेगळा अर्थ काढला आहे. ते या वक्तव्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. निवडणुकीत त्यांना समोर पराभव दिसत असल्याने ते अशा प्रकारे वागत आहेत. निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये आइटम नंबर एक, नंबर दोन, असे शब्द असतात. इमरती देवी यांचे नाव मला आठवलं नाही,म्हणून मी ‘आयटम’ शब्द वापरला. परंतु माझा हेतू त्यांचा अपमान करायचा नव्हता, किंवा वाईट हेतूने वापरला नाही. असं कमलनाथ यांनी सांगितले. तरीसुद्धा कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर,मी दिलगिरी व्यक्त करतो. असं म्हणत कमलनाथ यांनी माफी मागितली.
कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर भाजपचे मंत्री बिसाहूलाल यांनी देखील काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ सिंह यांच्या पत्नीवर अश्लील टिप्पणी केली आहे. बिसाहूलाल हे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत.
बिसाहूलाल सिंग यांनी विश्वनाथ सिंह यांची पत्नी राजवती त्यांच्यावर अश्लील टिप्पणी केली आहे. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर विश्वनाथ सिंह यांनी राजवती यांच्याशी विवाह केला होता.
निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्या संपत्तीचा उल्लेख करावा लागतो. विश्वनाथ सिंह यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात पहिल्या पत्नीचा उल्लेख केला नाही. त्यांनी या प्रतिज्ञापत्रात ‘रखैल’ चा उल्लेख केला. असं बिसाहूलाल सिंह माध्यमांशी बोलताना म्हणाले.
मध्यप्रदेश विधानसभेच्या 28 जागांच्या पोटनिवडणुकीसाटठीचे मतदान 3 नोव्हेंबर ला होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम