Ishan Kishan-Shreyas Iyer : ईशान, श्रेयस वार्षिक करारातून आऊट; क्रिकेट कारकीर्दही संपुष्टात? त्या चुकीची गंभीर शिक्षा..
Ishan Kishan-Shreyas Iyer : बीसीसीआयने (BCCI) नुकतीच वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. (BCCI Annual Contract 2023-24) या करार यादी मधून अनेक महत्वाच्या खेळाडूंना वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (BCCI central contract) मात्र या सगळ्यांमध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि ईशान किशन ishan Kishan या दोघांना देखील वार्षिक करार यादीमध्ये संधी दिली नसल्याने, क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना वार्षिक करार यादीतून वगळण्याचे कारणही स्पष्ट करण्यात आले आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ईशान किशन (ishan Kishan) सातत्याने बीसीसीआयच्या (BCCI) निशाणावर येत होता. खरंतर ईशान किशन आणि बीसीसीआय या वादाला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यापासून सुरुवात झाली. अचानक ईशान किशनने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून माघार घेतली. मानसिक थकव्याचे कारण देत, माघार घेतली होती. मात्र त्यांनतर ईशान किशन ‘कौन बनेगा करोडपती’ या रिॲलिटी शोमध्ये खेळताना दिसला. इतकंच नाही, तर दुबईमध्ये पार्टी करताना देखील त्याला स्पॉट करण्यात आले. साहजिकच या सगळ्यांचे फळ म्हणून त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली.
शिस्तगंगाच्या कारवाईचा भाग म्हणून ईशान किशनला अफगाणिस्तान विरुद्धच्या टी-ट्वेंटी मालिकेतून वगळण्यात आलं. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून देखील वगळण्यात आले. उर्वरित कसोटी मालिकेचा भाग होण्यासाठी त्याला रणजी ट्रॉफी (ranji trophy) खेळण्याचा सल्ला राहुल द्रविड (rahul Dravid) यांच्याकडून देण्यात आला. मात्र ईशान किशनने राहुल द्रविड यांचा सल्ला धुडकावून लावला.
श्रेयस अय्यर बाबत देखील काहीसा असाच प्रकार घडला. श्रेयस अय्यर पहिल्या दोन कसोटी सामन्यात अपयशी ठरला. भारतीय संघात पुनराजमान करण्यासाठी त्याला देखील रणजी ट्रॉफी (ranji trophy) खेळण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र श्रेयस अय्यरने दुखापतीचे कारण देत रणजी क्रिकेट खेळण्यास स्पष्ट नकार दिला. खेळाडू आयपीएलला (ipl) प्राधान्य देत असून, रणजी क्रिकेटकडे दुर्लक्ष करत आहेत. याची जाणीव झाल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शहा (jay shah) यांनी नवीन खेळाडूंना रणजी क्रिकेट खेळण्यास प्राधान्य द्या. असे पत्र देखील लिहिले. भारतीय संघात खेळायचं असेल, तर रणजी क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीला विचार केला जाईल. आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारावर भारतीय संघात संधी दिली जाणार नाही, हे स्पष्ट केले.
मात्र तरी देखील या दोघांनी रणजी क्रिकेट खेळण्यास नकार दिला. आणि म्हणून आता या दोघांवर कारवाई केली आहे. बीसीसीआयने जाहीर केलेल्या वार्षिक करार यादीतून दोघांनाही वगळण्यात आले आहे. या दोघांसाठी हा खूप मोठा धक्का असून, या दोघांवरही दोन वर्षाची बंदी घातली जाणार असल्याची माहिती आहे. याविषयी अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही. मात्र बीसीसीआयची यासंदर्भात मीटिंग होणार असून, त्यानंतर दोघांवर कारवाई केली जाईल अशी माहिती आहे.
बीसीसीआयने विनंती करून देखील श्रेयस अय्यर, ईशान किसन यांना रणजी क्रिकेटकडे दुर्लक्ष करणं आता चांगलंच भोवले आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघात प्रचंड स्पर्धा आहे. त्यातच वेस्टइंडीजमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप सुरू होण्यासाठीकाही महिनेच अवधी आहे. त्यामुळे नको त्यावेळी दोघेही बाहेर झाल्याने, दोघांसाठी खूप मोठा फटाका आहे. ईशान किशन आणि श्रेयस अय्यर दोघांना केवळ करार यादीतूनच वगळण्यात आलं नाही, तर आगामी दोन वर्ष भारतीय क्रिकेट संघात संधी दिली जाणार नसल्याने, आता एक प्रकारे या दोघांचेही क्रिकेट करिअर संपुष्टात येते की काय, अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.
हे देखील वाचा Virat Kohli vamika : विराट आणि वामिका पहिल्यांदाच एकत्र जेवताना झाले स्पॉट; बाप-लेकीचा सुंदर फोटो तुफान वायरल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम