Virat Kohli vamika : विराट आणि वामिका पहिल्यांदाच एकत्र जेवताना झाले स्पॉट; बाप-लेकीचा सुंदर फोटो तुफान वायरल..

0

Virat Kohli vamika : विराट कोहली (Virat Kohli) सध्या भारतीय क्रिकेट पासून दूर आहे. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत पहिल्यांदाच विराट कोहली संपूर्ण मालिकेतून बाहेर झाला आहे. साहजिकच त्यामुळे विराट कोहली नसण्याची जोरदार चर्चा देखील झाली. वैयक्तिक कारणामुळे विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका सोडावी लागली. विराट कोहली दुसऱ्यांदा पिता होणार असल्याने, त्याने मालिकेतून माघार घेतली. हे देखील आता स्पष्ट झाले. विराट कोहली सध्या लंडनमध्ये (London) आपल्या परिवारासोबत टाईम स्पेंड करत असून, याचे काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत.

विराट कोहली (Virat kohli) पाचव्या कसोटीतून देखील बाहेर झाला आहे. अशातच आता विराट कोहली आणि त्याची मुलगी वामिका (vamika) सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विराट कोहली आणि वामिका एकत्रित जेवतानाचे फोटो पहिल्यांदाच समोर आले. विराट आणि वामिकाचे फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल देखील झाले आहेत. विराट कोहली मुलगा आणि पती म्हणून किती जबाबदार आहे, हे प्रत्येकाला माहिती आहे. मात्र पिता म्हणून देखील विराट कोहलीचे दर्शन त्याच्या चाहत्यांना पहिल्यांदाच झाले आहे.

विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (anushka sharma) या दोघांनी अद्याप आपली मुलगी वामिकाचा फोटो अधिकृतपणे माध्यमांसमोर आणला नाही. मात्र नकळत सामन्यादरम्यान वामिकाचा चेहरा कॅमेऱ्याच्या माध्यमातून जगताला पाहायला मिळाला होता. आता पुनः एकदा विराट कोहलीची मुलगी वामिकाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

विराट आपल्या आपल्या फॅमिली बाबद प्रचंड जागरूक आहे. एअरपोर्टवर उतरल्यानंतर देखील विराट कोहली माध्यमांना वामिकाचे फोटो घेऊ नका, अशी विनंती करताना अनेकदा पाहायला मिळाला आहे. साहजिकच त्यामुळे लंडनमध्ये विराट आणि त्याची मुलगी वामीका एकत्रित डिनर करताना स्पॉट झाल्याने या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.

खरंतर विराट आणि वामिका या दोघांचाही स्पष्टपणे चेहरा दिसत नाही. लंडनच्या एका रेस्टॉरंटमध्ये (London restaurant) दोघांना डिनर  (Virat Kohli vamika dinner) करताना एका चाहत्याने पाठीमागून त्यांचे फोटो काढले आहेत. साहजिकच त्यामुळे दोघांचाही चेहरा दिसत नाही. मात्र दोघांनीही एकमेकांना मिळती जुळती वेशभूषा केल्याने, दोघेही प्रचंड क्यूट दिसत आहेत. दोघांनीही काळ्या आणि पांढऱ्या अशा रंगाच्या कॉम्बिनेशनसह कपडे घातले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोचे सौदर्य म्हणजे, विराट कोहलीची मुलगी वामिका स्वतः डायनिंग टेबलवर जेवताना पाहायला मिळत आहे. लहान वयात इतक्या परिपक्वततेने वामीका जेवण करत असल्याने, अनेकांना तिचे कौतुक वाटत आहे. Obsessedwith18 या एक्स युजर्सवरून विराट आणि वामीका यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

हे देखील वाचा  Rohit Sharma vs Shreyas Iyer : रोहित शर्माने कान टोचल्यानंतर श्रेयस अय्यरनेही घेतला मोठा निर्णय; जाणून घ्या दोघांचा वाद..

Virat Kohli On test series : मालिका विजयानंतर अखेर विराट कोहली परतला; पाचव्या कसोटीत होणार हे तीन बदल..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.