Rohit Sharma hardik Pandya : रोहित, हार्दिकचं एकमेकांविरुद्ध सोशल मीडिया वॉर; मुंबई इंडियन्स नाईलाजाने घेणार हा मोठा निर्णय..
Rohit Sharma hardik Pandya : आंतरराष्ट्रीय क्रिकेट पेक्षा ही आयपीएलला (IPL) अधिक महत्त्व प्राप्त झाला आहे. अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यापेक्षा आयपीएलला प्राधान्य देताना पाहायला मिळतात. यात हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव आघाडीवर आहे. हार्दिक पांड्या अनेक महत्त्वाच्या आयसीसी टूर्नामेंट (ICC tournament) मधून दुखापतीमुळे अनेकदा बाहेर झाला आहे. आयपीएलमध्ये मात्र हार्दिक पांड्या एकही सामना चुकवताना पाहायला मिळत नाही. आयपीएल फ्रेंचायजी संघाचे कर्णधारपद मिळवण्यासाठी हार्दिक पांड्याने रोहित शर्माशी (Rohit Sharma) पंगा घेत, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सोडल्याचे उदाहरणही ताजे आहे.
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधार पद नाकारल्यानंतर हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स (gujrat Titans) संघाकडून खेळला. दोन सीजन गुजरात कडून खेळताना हार्दिक पांड्याने एक वेळ फायनल आणि दुसऱ्या वेळेस उपविजेतेपद देखील फटकावले. साहजिकच हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून केलेल्या कामगिरीची भुरळ मुंबई इंडियन संघाला पडली. आणि पुन्हा मुंबई इंडियन्स संघाने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्माची कर्णधार पदावरून हाकलपट्टी करत हार्दिककडे कर्णधार पद दिले.
मुंबई इंडियन्सला आपण घेतलेला निर्णय योग्य असून, सगळं काही ठीक होईल. असं वाटत होतं. मात्र रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यासाठी इच्छुक नसल्याचं पत्नी रीतीने स्पष्ट केलं आहे. इतकच नाही, तर हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो देखील केलं आहे. हार्दिक पांड्याचं करियर रोहित शर्माच्या नेतृत्वात बहरले. मात्र आता रोहित शर्माशी हार्दिक पांड्याने थेट पंगा घेतला आहे. ज्यामुळे मुंबई इंडियन्स देखील अडचणीत आली आहे.
रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांमध्ये असणारे मतभेद आता टोकाला गेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत रोहित शर्मा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात खेळण्यास इच्छुक नसल्याची माहिती आहे. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांनी इंस्टाग्राम वरून एकमेकाला अनफॉलो देखील केलं आहे. एकवेळ हार्दिक पांड्या रोहित शर्माचं तोंड भरून कौतुक करताना पाहायला मिळत होता. आता मात्र दोघांमध्ये प्रचंड मतभेद निर्माण झाले आहेत.
2024 मध्ये सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स संघाकडून खेळले तर संघाचे वातावरण बिघडण्याची चिंता मुंबई इंडियन्सला आहे. संघातील खेळाडूंमध्ये देखील हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा असे दोन गट पडण्याची शक्यता आहे. साहजिकच या प्रकरणामुळे संघाच्या कामगिरीवर देखील परिणाम होणार होईल. ही चिंता मुंबई इंडियन्सला सतावत आहे. त्यामुळे ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्स रोहित शर्माला सोडण्यास तयार असल्याचं देखील कळतं.
Rohit Sharma Delhi capitals captain : रोहित शर्मा दिल्ली संघाचा नवा कर्णधार; ऋषभ पंत या भूमिकेत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम