दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही;राष्ट्रवादी
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपची एक हाती सत्ता येईल असं चित्र होतं. निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी संपूर्ण महाराष्ट्रभर महाजनादेश यात्रा काढली होती. यात्रेतील गर्दी पाहून तरी महाराष्ट्रला असंच वाटप होतं. परंतु भाजपच्या आशेवर पाणी फिरण्याचे काम 18 ऑक्टोबरला भरपावसात साताऱ्यात झालेली पवार साहेबांची सभा होती. असं अनेक राजकीय विश्लेषकांच म्हणणं होतं.
पवार साहेबांनी भर पावसात साताऱ्यामध्ये केलेला सभेला आज एक वर्ष पूर्ण झालं. 18 ऑक्टोबरला पवार साहेबांनी केलेली सभेला तरुणांकडून खूप मोठा रिस्पॉन्स मिळाला. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी भर पावसात झालेली पवार साहेबांची ही सभा ऐतिहासिक ठरली.
साताऱ्याच्या या सभेपूर्वी भाजप राज्यात एक हाती सत्ता मिळू शकतो असं चित्र होतं. परंतु या सभेनंतर अनेक राजकीय विश्लेषकांनी या सभेचा परिणाम या निवडणुकीवर होऊ शकतो. आणि दोन्ही काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळू शकतं असं बोललं गेलं. आणि झालंही तसंच.
साताऱ्यात भरपावसात पवार साहेबांनी केलेल्या सभेला एक वर्ष पूर्ण झालं यानिमित्ताने राष्ट्रवादीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये विरोधकांनी पवार साहेबांना मारलेले टोमणे, आणि पवार साहेबांनी त्यांना दिलेली उत्तरे मांडली आहेत. या व्हिडिओला राष्ट्रवादीने सातारा सभा वर्षपूर्ती असं नाव दिलं आहे. रणनीती आव्हान आणि सगळे पैलवान उभ्याने लोळवले, दिल्ली भिजवणारी ही सभा महाराष्ट्र विसरणार नाही,असंही या व्हिडिओतून म्हटलं आहे.
राष्ट्रवादीने पवार साहेबांचा ऐंशी वर्षाचा योद्धा असाही उल्लेख केला आहे. राष्ट्रवादीने साताऱ्यातील या सभेच्या आठवणींना आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून उजाळा दिला आहे.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम
नक्कीच पवार साहेबांची ही सभा ऐतिहासिक ठरली.