Ishan Kishan : हार्दिक पांड्याशी जवळीक साधनं ईशान किशनला भोवले; ..म्हणून आहे संघातून बाहेर..

0

Ishan Kishan : ईशान किशन (ishan Kishan) गेल्या काही महिन्यांपासून कमालीचा चर्चेत राहिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून ईशान किशनने माघार घेतली होती. तेव्हापासून भारतीय संघात त्याला संधी मिळाली नाही. आता भारतीय संघात स्थान मिळवणे त्याच्यासाठी अवघड बनलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध 3 टी20 सामन्यांची मालिका खेळण्यात आली. त्यानंतर आता सुरू असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या (ind vs ENG test series) कसोटी मालिकेत देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

मानसिक थकव्याचे कारण देत, ईशान किशनने दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातून माघार घेतली होती. मात्र त्यानंतर तो दुबईमध्ये पार्टी करताना दिसला. मानसिक थकव्याचे खोटं कारण देत पार्टी करताना दिसल्यामुळे त्याने बीसीसीआयची (BCCI) फसवणूक केल्याचं बोललं गेलं. ईशान किशनने केलेला चुकीच्या वर्तवणुकीमुळे त्याला भारतीय संघापासून दूर ठेवलं गेल्याचं देखील बोललं गेलं. आता मात्र ईशान किशनला भारतीय संघापासून दूर ठेवण्याचे वेगळेच कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेतील उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठी अद्यापही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली नाही. विराट कोहली (Virat kohli) खेळणार की नाही, याविषयी देखील मोठी संभ्रमता असून, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण मालिकेतून विराट कोहली बाहेर पडला आहे. अशातच आता ईशान किशनच्या निवडी विषयी देखील मोठी चर्चा सुरू झाली आहे.

उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. उर्वरित तीन कसोटी सामन्यासाठी देखील ईशान किशनची निवड केली जाणार नसल्याचं बोललं जात आहे. ईशान किशन संदर्भात कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. ईशान किशनच्या प्रश्नावर बोलताना राहुल द्रविड म्हणाला, त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्याच्यावर कोणताही दबाव देखील टाकण्यात आला नाही.

कोच राहुल द्रविड यांच्याकडून ईशान किशनवर कोणतीही कारवाई केली नसली असं सांगण्यात आलं असलं तरी सोशल मीडियावर मात्र ईशान किशनला भारतीय संघापासून दूर ठेवण्याचे कारण सांगण्यात आलं आहे. ईशान सध्या हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि कृणाल पांड्या या दोघांसोबत बडोद्यामध्ये क्रिकेटचा सराव करत आहे. ईशान किशनने हार्दिक पांड्या सोबत केलेली जवळीकता हेच ईशान किशनला भारतीय संघापासून दूर ठेवण्याचे मुख्य कारण असल्याचं बोललं जात आहे.

हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा या दोघांचे संबंध बिघडले आहत. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाच्या कर्णधार पदी हार्दिक पांड्याची निवड केल्यानंतर, या संबंधांमध्ये आणखी कटुता आली आहे. रोहित शर्माचे कर्णधारपद गेल्यानंतर पत्नी रीतीकाने उघडपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या सोबत ईशान किशन साधलेली जवळीकता रोहित शर्माला आवडली नसल्याचं बोललं जात आहे. केवळ या एवमेव कारणामुळे त्याला बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असंही सांगितलं जातंय.

हे देखील वाचा  ritika sajdeh on Mumbai Indians: रोहित शर्माला कॅप्टनसीवरून हटवण्याचे कारण स्पष्ट करताच पत्नी रितिका भडकली; पोस्ट करून म्हणाली..

England team leaves India : दुसऱ्या कसोटीनंतर या कारणामुळे इंग्लंडने सोडला भारत; कारण जाणून तुम्हीही..

Ricky ponting on Rishabh pant: ऋषभ पंत खेळणार; रोहित शर्मा कर्णधार? कोच पाँटिंगकडून आयपीएल प्लॅन विषयी खुलासा..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.