यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार का?

0

देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये यंदा कोरोनामुळे अनेक प्रथम मोडीत निघाल्या. जत्रा, यात्रा या दरवर्षी अगदी उत्साहात साजरी होत असतात. आतापर्यंत या प्रथांमध्ये कधी खंड पडला नसेल. मात्र यावर्षी अनेक सण, वेगवेगळ्या प्रथा यामध्ये खंडन पडले.


यंदाच्या वर्षी चा दसरा मेळावा हा देखील ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सर्व शिवसैनिकांना औस्तुक्य वाटत असते. कारण दसरा मेळाव्याला शिवसेनाप्रमुख व काही नेते मंडळी शिवसैनिकांना संबोधित करत असतात. त्यामध्ये पक्षाची ध्येयधोरणे व पुढील वाटचाली बद्दल महत्वाच्या भूमिका घेतल्या जातात. सर्व शिवसैनिक या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात.


शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावर साजरा करण्याची एक वेगळीच परंपरा आहे. दरवर्षी दिसणारा उत्साह व ती गर्दी पाहायला मिळणार नाही कारण कोरोना. इतिहासामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा कोरोनामुळे ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे यंदा शिवतीर्थावर होणारी गर्दी, जल्लोष व उत्साह पाहायला मिळणार नाही. प्रथेनुसार प्रथम शस्त्रपूजा केली जाते. नंतर काही नेते मंडळी शिवसैनिकांना संबोधित करतात व सर्वात शेवटी शिवसेनाप्रमुख शिवसैनिकांना विचारांचं सोनं देत असतात.


शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांच्या भाषणानंतर रात्री आठ वाजता शिवसेना प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना संबोधित करतील. यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यामुळे व त्यामध्येही ठाकरे कुटुंबाचा पहिला मुख्यमंत्री झाला असल्यामुळे यंदा शिवसैनिकांना जोरदार सेलिब्रेशन करायचे होते. आतापर्यंत ही दसरा मेळावा न होण्याची तिसरी वेळ आहे.


यंदाचा दसरा मेळावा मध्ये उद्धव ठाकरे काय काय बोलतील? यावरती सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण उद्धव ठाकरे यांनी देखील आपण या वर्षी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून काही विषयांवरती बोलणार असल्याचे स्पष्ट केले स्पष्ट केले आहे. कंगना राणावत प्रकरण असेल किंवा अर्नब गोस्वामी या दोघांच्याही बाबतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संयमाची भूमिका घेतली आहे. शिवसैनिक या मुद्द्यांवरून जरी चिडले असले तरीदेखील उद्धव ठाकरे यांनी याबाबत मौन बाळगले व संयम ठेवला. ते या मुद्द्यांवर बोलतील का? याची उत्सुकता शिवसैनिकांमध्ये आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.