Virat Kohli mother News: विराट कोहलीवर कोसळलाय दुःखाचा डोंगर; प्रेग्नेंसी नाही, कसोटीतून माघार घेण्याचे हे आहे कारण..

0

Virat Kohli mother News: सध्या भारत आणि इंग्लंड (IND vs ENG test series) यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्याची मालिका सुरू आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरा सामना 2 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat kohli) खेळताना दिसणार नाही. वैयक्तिक कारण देत विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतली आहे.

पहिल्या दोन कसोटीतून विराट कोहलीने माघार घेतल्याने, क्रिकेट चाहते निराश असल्याचं पाहायला मिळाले.पहिल्या दोन कसोटी सामन्यातून वयक्तिक कारण देत, विराटने माघार घेतली. त्यामुळे विराट कोहलीने नक्की का माघार घेतली? याविषयी विराट कोहलीच्या चाहत्यांमध्ये प्रचंड संभ्रमता असल्याचं पाहायला मिळाले. अशातच आता विराट कोहलीने माघार घेतल्याचे नेमके कारण समोर आले आहे.

टेस्ट क्रिकेट माझ्यासाठी सर्वात महत्वपूर्ण फॉरमॅट असल्याचं विराट कोहली नेहमी बोलताना पाहायला मिळाला आहे. टेस्ट क्रिकेटला विराट कोहली प्राधान्य देताना पाहायला देखील मिळाला आहे. आपल्या कॅप्टनशिपच्या कारकिर्दीत विराट कोहलीने भारतीय टेस्ट क्रिकेट पूर्णतः बदलून टाकले. सध्या विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये देखील आहे. अशावेळी विराट कोहलीने अचानक पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार का घेतली? असा प्रश्न पडला होता. आता मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

विराट कोहलीने पहिल्या दोन कसोटी सामन्यातून माघार घेण्याचे कारण समोर आले आहे. विराट कोहलीने अनुष्का शर्माच्या (anushka sharma) प्रेग्नेंसी संदर्भात पहिल्या दोन कसोटीतून माघार घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र अनुष्का शर्मा प्रेग्नेंसीच्या कारणामुळे विराट कोहलीने माघार घेतली नसून, विराट कोहलीची आई आजारी असल्यामुळे त्याने माघार घेतल्याची माहिती मिळाली आहे.

विराट कोहलीच्या आईची तब्येत बरोबर नसल्याने विराट कोहली आईची काळजी घेत आहे. विराट कोहलीच्या हॉस्पिटलमध्ये असल्याची माहिती आहे. विराट कोहलीची आई पूर्णपणे बरी झाल्यानंतर, विराट पुन्हा मैदानात दिसणार आहे. तिसऱ्या कसोटीत विराट कोहली भारतीय संघात कमबॅक करताना दिसणार आहे.

हे देखील वाचा  ENG vs IND 2nd test: ब्रह्मदेव आला तरी भारत दुसरी कसोटी वाचवू शकणार नाही; त्या कारणामुळे इंग्लंड जिंकणार एकहाती..

Rohit Sharma on Virat kohli ..म्हणून विराट कोहली होणं सोप्पं नाही; मी खूप लकी आहे त्याला..;रोहितचं विराट विषयी मोठं विधान..

IND vs ENG 2nd test: दुसऱ्या कसोटीतून जडेजा, राहुल बाहेर, शुभमन गिललाही डच्चू; हे तीन खेळाडू करणार डेब्यू..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.