पंतप्रधानांचे महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन!

0

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. दोन-तीन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मोठी पूरपरिस्थिती निर्माण झाली.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केंद्र शासन महाराष्ट्राला सर्वतोपरी मदत करेल. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट करून दिली आहे.

पंतप्रधान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मराठीत एक ट्वीट केले आहे.
“महाराष्ट्रात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांच्याशी बोललो. आपत्तीग्रस्त बंधू-भगिनींबरोबर माझ्या सहवेदना आहेत. बचाव आणि मदतकार्यामध्ये केंद्र सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असं आश्वासन मी पुन्हा एकदा दिलं.” असं ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात माहिती दिली.

महाराष्ट्रातील शेतकरी पुरता हवालदिल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. शेतकऱ्याची उभी पिकं अक्षरशः आडवी झाली आहेत.

पंढरपूर सांगली भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काल रात्री पंढरपूरच्या चंद्रभागानदीतुन उजनी धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे 2 लाख 73 हजार क्‍युसेकनं‌ पाणी वाहत होतं. शहरातील एकूण 16 हजार पेक्षा जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरितही करण्यात आलं आहे. प्रदक्षिणा रोडवर लोकांना बोटीने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.