Rohit Sharma vs Hardik Pandya: मुंबई इंडियनच्या पोस्ट मधून रोहित शर्मा गायब होण्याचं धक्कादायक कारण समोर..

0

Rohit Sharma vs Hardik Pandya: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या चांगलाच चर्चेत आहे. 2022 नंतर पुन्हा एकदा रोहित शर्माची भारताच्या t20 संघात कर्णधारपदी नियुक्ती केली गेली आहे. 2022 नंतर भारतीय टी ट्वेंटी संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे देण्यात आले होते. मात्र हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे पुन्हा एकदा रोहित शर्माकडे टी ट्वेंटी संघाची धुरा देण्यात आली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) बरोबर विराट कोहलीची (Virat Kohli) देखील टी-ट्वेंटी संघात वापसी झाली आहे.

रोहित शर्माची t20 संघात वापसी झाल्यामुळे हार्दिक पांड्याचे नेतृत्व करण्याचे स्वप्नही भंगले आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी देखील नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या t-20 सामन्यानंतर इंग्लड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली. कसोटी संघाची संघाची घोषणा केल्यानंतर, मुंबई इंडियन्सने नव्या वादाला तोंड फोडले. खरंतर पहिल्या t20 सामन्यात रोहित शर्माने हार्दिक पांड्याचा लाईक टू लाईक रिप्लेसमेंट असलेल्या शिवम दुबेला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिल्यानंतर या वादाला सुरुवात झाली.

जितेश शर्मा (jitesh Sharma) बरोबर संजू सॅमसनला (Sanju Samson) देखील भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र रोहित शर्माने अचानक शिवम दुबेला (shivam Dube) खेळवण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये कर्णधार पदावरून मतभेद आहेत. म्हणूनच हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून शिवम दुबेला भारताच्या प्लेइंग11 मध्ये संधी दिली जात असल्याचं बोललं जात आहे.

रोहित शर्माने दिलेल्या संधीचा शिवम दुबेने देखील पुरेपूर फायदा उठवला. गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये देखील चमकदार कामगिरी करत सामनावीर पुरस्कार मिळवला. विजयानंतर रोहित शर्माने देखील शिवम दुबेचे विशेष कौतुक केले. रोहित शर्माचे हे कृत्य मुंबई इंडियन्सला आवडले नसल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शर्मांच्या ॲक्शनची रिएक्शन म्हणून, मुंबई इंडियन्सने इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी निवड झालेल्या खेळाडूंची यादी आणि तीन खेळाडूंचे फोटो आपल्या सोशल मीडियाद्वारे पोस्ट केले.

भारतीय संघाचा कर्णधार असूनही रोहित शर्माचा फोटो मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला नाही. रोहित शर्मा ऐवजी केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह तिघांचा फोटो पोस्ट केला. सामना जिंकून दिल्यानंतर, रोहित शर्माने शिवम दुबेचे केलेले विशेष कौतुक मुंबई इंडियन्सच्या जिव्हारी लागल्यानेच, मुंबई इंडियन्स सोशल मीडिया टीमने हा निर्णय घेतला. चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर मात्र मुंबई इंडियन्सने आज रोहित शर्मा संदर्भात आणखी एक पोस्ट करून प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma vs mumbai Indians: रोहित शर्मा पुढे मुंबई इंडियन्सची शरणागती; मुंबई इंडियन्स कडून अखेर यूटर्न..

Rohit Sharma vs MI: पांड्याला टार्गेट करताच मुंबई इंडियन्स कडून रोहीत शर्माची उचलबांगडी; MI कडून खेळण्यास रोहितचाही नकार..

IND vs AFG 2nd T20: रोहित-विराटच्या ओपनिंगमुळे संघात तीन बदल; असा आहे दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ..

Acharya Chanakya thought: काहीही झालं तरी या दोन गोष्टी कोणालाही सांगू नका; तरच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.