पंढरपूर मधील जीवनमान झाले विस्कळीत!

0

गेली दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनीतून सोडलेल्या विसर्गामुळे पंढरपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून लोकांचे जीवनमान विस्कळीत झाले आहे.

दोन दिवस सतत मुसळधार पडलेल्या पावसामुळे आणि उजनी धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे भीमा नदीच्या पाण्याची पातळी रात्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. भीमा नदी सध्या 2 लाख 73 हजार क्यूसेकने वाहत आहे.

पंढरपूर मधील प्रदिक्षणा रोडवर सध्या पाच ते सहा फूट पाणी आलेलं असून,पंढरपूर मधील लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. पंढरपूर मधील अनेक दुकाने पाण्याखाली गेलेली आहेत. लोकवस्तीमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून संपूर्ण पंढरी जलमय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

या पूरस्थितीत रेस्क्यू फॉर्सने आणि व्हाईट आर्मीच्या जवानांनी शहर व तालुक्यातील नागरिकांना बाहेर काढले आहे. शहर आणि तालुका यातील मिळून जवळपास 16 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे.

अतिवृष्टीमुळे जवळपास शंभर गावांना या पुराचा फटका बसला आहे. साडेतीन हजार कुटुंबीयांच्या घरात पाणी शिरले असून या पूर परिस्थितीमुळे शहरातील सात जणांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर पंढरपूरमधील संपूर्ण प्रदिक्षणा मार्गावर लोकांना होडीने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. चंद्रभागेला तब्बल तेरा वर्षानंतर पूर आल्याचे सांगण्यात येत आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.