Rohit Sharma vs MI: पांड्याला टार्गेट करताच मुंबई इंडियन्स कडून रोहीत शर्माची उचलबांगडी; MI कडून खेळण्यास रोहितचाही नकार..
Rohit Sharma vs MI: आयपीएल 2024 (ipl auction 2024) चा लिलाव प्रक्रिया पूर्ण झाला असला तरी अजूनही रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) चर्चा काही कमी होताना दिसत नाहीत. एकीकडे इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा होताच, दुसरीकडे नवा वाद निर्माण झाला आहे. आयपीएल फ्रेंचाईजीचा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हस्तक्षेप काही लपून राहिलेला नाही. साहजिकच त्यामुळे आयपीएल फ्रेंचाइजीच्या (ipl) प्रत्येक कृतीची बातमी होताना पाहायला मिळते.
गुजरात टायटन्स (gujrat Titans) संघाचे कर्णधारपद सोडून हार्दिक पांड्या (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील झाला. हार्दिक पांड्या गुजरात संघाचे कर्णधारपद सोडून आल्यामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन संघाचा कर्णधार असणार का? याविषयी अनेक चर्चाही रंगल्या. काही दिवसानंतर, मुंबई इंडियन्सकडून अधिकृतरित्या हार्दिक पांड्या यापुढे मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असेल, असं निश्चित करण्यात आलं. मुंबई इंडियन्सच्या या निर्णयामुळे रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला चाहत्यांनी टार्गेट केले. मुंबई इंडियन्स इंस्टाग्राम पेजला 2 मिलियन युजर्सने अनफॉलो देखील केले.
रोहित शर्माला विश्वासात न घेता मुंबई इंडियन्सकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले गेले. त्यातच रोहित शर्माची पत्नी रीतीकानेही चेन्नईने केलेल्या पोस्टला रिप्लाय दिला. मात्र मुंबई इंडियन्सने केलेल्या पोस्टला कोणत्याही प्रकारचा रिप्लाय दिला नाही. त्यामुळे रोहित शर्माची पत्नी देखील नाराज असल्याचे स्पष्ट झालं. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्मामध्ये सगळं काही आलबेल नाही, हे स्पष्ट झालं आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध सुरू असलेल्या टी ट्वेंटी सिरीजसाठी रोहित शर्माची कर्णधारपदी निवड करण्यात आली. रोहित शर्माला कर्णधार करताच हार्दिक पांड्याचे टी ट्वेंटी कर्णधारपद धोक्यात आले. टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये देखील रोहित शर्मा हाच भारतीय टी-ट्वेंटी संघाचा कर्णधार असणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा आता टी ट्वेंटी विश्वचषकाच्या दृष्टीने संघ बांधायला सुरुवात करत आहे. अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या पहिल्या t-20 सामन्यात रोहितने शिवम दुबेला खेळवून हार्दिक पांड्याला डिवचलं.
मिळालेल्या संधीचे सोने करत शिवम दुबेने सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला. सामना जिंकल्यानंतर रोहित शर्माने शिवम दुबेच्या कामगिरीवर भरताच खुश असल्याचं पाहायला मिळालं. साहजिकच हार्दिक पांड्याची लाईक टू लाईक रिप्लेसमेंट म्हणून रोहित शर्मा शिवम दुबेला खेळवत असल्याचे देखील बोललं गेलं. रोहित शर्माचे हेच कृत्य मुंबई इंडियन्सच्या पचनी पडले नसून, मुंबई इंडियन्सने रोहित शर्माची उचलबांगडी देखील केली आहे.
पहिल्या टी ट्वेंटी सामन्यानंतर पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय घोषणा करण्यात आली. पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा होताच, मुंबई इंडियन्सने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून कसोटी संघाचा स्कॉड पोस्ट केला. मात्र या पोस्टमध्ये मुंबई इंडियन्सने रोहीत शर्मा कॅप्टन असतानाही केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह या तिघांचा फोटो टाकला. मुंबई इंडियन्सच्या पोस्टमधून रोहित शर्मा गायब असल्याने मुंबई इंडियन्स देखील रोहितवर नाराज असल्याचे उघड झाले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा देखील हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघातून खेळण्यासाठी इच्छुक नाही. दुसरीकडे मात्र मुंबई इंडियन्स देखील रोहित शर्माला सोडण्यासाठी तयार नाही. रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला मला ट्रेड व्हायचं असल्याचं सांगितलं आहे. आयपीएल सुरू होण्याच्या एक महिना अगोदर पर्यंत ट्रेड विंडो ओपन राहणार आहे. त्यामुळे तो पर्यंत कोणताही खेळाडू कोठेही जाऊ शकणार आहे. मात्र यासाठी मूळ संघ मालकाची परवानगी आवश्यक आहे.
हे देखील वाचा Acharya Chanakya thought: काहीही झालं तरी या दोन गोष्टी कोणालाही सांगू नका; तरच..
IND vs AFG 2nd T20: रोहित-विराटच्या ओपनिंगमुळे संघात तीन बदल; असा आहे दुसऱ्या T20 साठी भारतीय संघ..
Rohit Sharma run out: रनआउट होताच रोहितने शुभमन गिलला हसडल्या शिव्या; काय म्हणाला? पाहा व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम