Rohit Sharma run out: रनआउट होताच रोहितने शुभमन गिलला हसडल्या शिव्या; काय म्हणाला? पाहा व्हिडिओ..

0

Rohit Sharma run out: काल भारत आणि अफगाणिस्तान विरुद्ध पहिला टी ट्वेंटी सामना पार पडला. (IND vs AFG 1st T20) भारतीय संघाने एकतर्फी विजय साजरा करत, तीन टी ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. खराब सुरुवातीनंतर, भारतीय संघाच्या मधल्या फळीने दमदार कामगिरी करत अफगाणिस्तानवर विजय मिळवला. (India with Afghanistan by six wickets) मात्र या विजयापेक्षा जास्त चर्चा रोहित शर्माच्या रन आउटची झाली. रन आउट झाल्यानंतर, रोहित शर्मा (Rohit Sharma) शुभमन गिलवर (shubman gill) चांगलाच संतापला.

यशस्वी जयस्वाल दुखापतीमुळे पहिला टी ट्वेंटी सामना खेळू शकला नाही. शुभमन गिल (shubman gill) रोहित शर्मा (Rohit Sharma) बरोबर ओपनिंग करण्याची संधी मिळाली. पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात विराट आणि यशस्वी जयस्वाल दोघेही उपलब्ध नसल्यामुळे, तिलक वर्मा आणि शुभमन गिलला संधी मिळाली. मात्र दोघांनाही या संधीचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. शुभमन गिलने तर थेट कॅप्टन रोहित शर्मालाच (Rohit Sharma) रन आउट केले.

कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून अफगाणिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. अफगाणिस्तानची सुरुवात प्रचंड निराशाजनक झाली. अखेरच्या षटकात मोहम्मद नबीने आक्रमक फटकेबाजी करत अफगाणिस्तान संघाला 158 धावांपर्यंत मजल मारून दिली. 159 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय संघाची सुरुवातही प्रचंड निराशाजनक झाली. डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्मा शून्यावर धावबाद झाला.

2022 नंतर रोहित शर्मा एकही आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामना खेळलेला नाही. तब्बल 427 दिवसानंतर रोहित शर्मा पहिला टी ट्वेंटी सामना खेळला. मात्र दुसऱ्याच चेंडूवर तो धावबाद झाला. धाव घेण्यासाठी रोहित शर्माने केलेला कॉल शुभमन गिलने पाहिलाही नाही. एक धाव पूर्ण होत असतानाही शुभमनच्या चुकीचा रोहित शर्मा बळी ठरला. रोहित शर्मा धाव बाद झाल्यानंतर मात्र शुभमन गिलवर प्रचंड संतापला. स्टंप माइक पासून दूर जाऊन रोहित शर्माने शुभमन गिलला शिव्या देखील दिल्याचं पाहायला मिळत आहे.

क्रिकेटच्या मैदानावर रोहित शर्मा अनेकदा शिव्या देताना पाहायला मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत देखील रोहित शर्माने रीव्ह्यू संदर्भात बोलताना शिवी दिली होती. अनेक खेळाडूंशी बोलताना रोहित शर्माच्या तोंडून शिवी निघते. असं खेळाडू देखील बोलतात. परंतु रोहित शर्माचा हा संवाद साधण्याचा अंदाज आहे. मात्र रोहित शर्मा बाद झाल्यानंतर शुभमन गिलवर चांगलाच संतापला होता. दुसऱ्या T20 सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली दोघांचीही वापसी होणार असल्याने, शुभमन गिलला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.

हे देखील वाचा  AFG vs IND 1St T20 match: T20 सिरीजमध्ये या दोन गोष्टी सुधारा, अन्यथा T20 सोडा; विराट, रोहितला BCCI कडून शेवटची संधी..

BCCI On Virat Kohli Rohit Sharma: ओपन करून या अपेक्षा पूर्ण करा अन्यथा..; विराट रोहीतला BCCI ची ताकीद..

Hardik Pandya on BCCI: रोहित शर्माला कर्णधार करताच हार्दिक पांड्याची BCCI ला चपराक; पोस्ट करून म्हणाला..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.