Virat Kohli drop out T20I: विराट कोहलीने मारून घेतला स्वतःच्या पायावर धोंडा; विराट T20 मधून बाहेर! कारणही समोर..

0

Virat Kohli drop out T20I: अफगाणिस्तान विरुद्ध उद्या भारताचा पहिला टी-ट्वेंटी सामना मोहालीच्या मैदानावर पार पडणार आहे. (India vs Afghanistan first T20 at Mohali) T 20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) अगोदर ही शेवटची टी-ट्वेंटी मालिका असल्याने, या मालिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माची (Rohit Sharma) निवड केल्याने देखील टी-ट्वेंटी मालिका चर्चेत आहे. मात्र आता विराट कोहलीच्या बाबतीत आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या पहिल्या त सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला असताना, अचानक विराट कोहली माघार घेतली आहे. भारताचे कोच राहुल द्रविडने (Rahul Dravid) या संदर्भात पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. विराट कोहलीने आपल्या वैयक्तिक कारणामुळे पहिला टी-ट्वेंटी सामना खेळणार नसल्याचे सांगितलं आहे. मात्र अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या संपूर्ण मालिकेविषयी देखील शाशंकता निर्माण झाली आहे.

आगामी t20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची T20मालिका आहे. मात्र तरी देखील विराटने पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यातून अधिकृतरित्या माघारी घेतली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विराट कोहली संपूर्ण T20 मालिका खेळणार नसल्याची माहिती आहे. विराट कोहलीचा हा निर्णय स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणार आहे. विश्वचषकापूर्वी विराट कोहलीला T20 क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी होती. मात्र आता विराटने माघार घेतल्यामुळे ही संधी हुकली आहे.

तसं पाहायला गेलं, तर विराट कोहलीला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. आकडे सर्व काही सांगून जातात. जर्नालिस्ट आणि बीसीसीआयच्या विराट कोहली निशाणावर असल्याचं पाहायला मिळते. साहजिकच त्यामुळे आता विराट कोहलीच्या अगेन्स अजेंडा देखील चालवला जाण्याची शक्यता आहे.

विराट कोहलीची टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये जागा बनत नाही, म्हणऱ्यांना आपल्या बॅटच्या माध्यमातून चोक प्रत्युत्तर देण्याची संधी विराट कोहलीकडे होती. मात्र विराटने पहिला टी ट्वेंटी पासून स्वतःला बाजूला करून मोठी चूक केली असल्याचं बोललं जात आहे. विराट कोहलीने अचानक पहिल्या टी-ट्वेंटी मधून माघार घेतल्याने आता संजू सॅमसन, (Sanju Samson) आणि जितेश शर्मा (jitesh Sharma) या दोघांनाही खेळण्याची संधी मिळणार आहे.

2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकानंतर विराट कोहली एकही आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामना खेळला नाही. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाकडे केवळ तीनच t20 सामने उरले आहेत. या मालिकेनंतर भारतीय संघाला थेट t20 विश्वचषकात आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. त्यामुळे t20 विश्वचषक संघात आपली दावेदारी पक्की करण्याची विराटकडे शेवटची संधी होती. उर्वरित दोन ट्वेंटी-ट्वेंटी सामने विराट खेळणार की नाही, याविषयी देखील स्पष्टता नाही. मात्र पहिला t20 सामना विराटने अधिकृतरित्या आपण वैयक्तिक कारणामुळे खेळत नसल्याचं जाहीर केलं आहे.

हे देखील वाचा AFG vs IND 1St T20 match: T20 सिरीजमध्ये या दोन गोष्टी सुधारा, अन्यथा T20 सोडा; विराट, रोहितला BCCI कडून शेवटची संधी..

IND vs AFG 1st T20 Live: गिल, जयस्वाल, रिंकू सिंह या तिघांपैकी एकच असणार प्लेइंग 11 मध्ये; जाणून घ्या संघाची मजबुरी..

Hardik Pandya on BCCI: रोहित शर्माला कर्णधार करताच हार्दिक पांड्याची BCCI ला चपराक; पोस्ट करून म्हणाला..

IND vs AFG 1st T20 playing 11: कितीही चांगला खेळला तरी रिंकू सिंह प्लेइंग इलेव्हनचा भाग नसणार; होय ही भारतीय संघाची मजबुरीच..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.