IND vs AFG 1st T20 Live: गिल, जयस्वाल, रिंकू सिंह या तिघांपैकी एकच असणार प्लेइंग 11 मध्ये; जाणून घ्या संघाची मजबुरी..
IND vs AFG 1st T20 Live: उद्या भारत आणि अफगाणिस्तान विरुद्ध (India vs Afghanistan T20) पहिला टी ट्वेंटी सामना मोहालीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. विराट कोहली (Virat kohli) रोहित शर्माची (Rohit Sharma) t20 संघात वापसी झाल्याने, या सामन्याची प्रतीक्षा अनेकांना लागून राहिली आहे. क्रिकेट चाहत्यांना देखील एका वर्षानंतर या दोघांनाही t20 मध्ये एकत्र खेळताना पाहिला मिळणार आहे. साहजिकच त्यामुळे या सामन्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मात्र या दोघांची टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये वापसी झाल्यामुळे, भारतीय प्लेइंग इलेव्हनचे कॉम्बिनेशन प्रचंड बिघडलेलं पाहायला मिळत आहे.
2022 नंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा याशिवाय t20 क्रिकेटचा संघ बांधायला सुरुवात केली गेली. 2022 नंतर अनेक टी ट्वेंटी सिरीजमध्ये नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली. नवीन खेळाडूंनी कामगिरी देखील ठीकठाक केली. खासकरून रिंकू सिंहने (Rinku Singh) दमदार खेळाचे प्रदर्शन करत, भारतीय टी-ट्वेंटी संघाचा दरवाजा अक्षरशः तोडला आहे. रिंकू सिंहने केलेल्या दमदार खेळाच्या जोरावर भारतीय टी-ट्वेंटी संघाच्या प्लेइंग इलेव्हन मधून त्याला बाहेर केलं जाऊ शकत नाही.
भारताच्या प्लेयिंग इलेव्हन मधून रिंकू सिंहला बाहेर केलं जाऊ शकत नसलं, तरी देखील इच्छा असूनही रिंकू सिंहला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देता येणार नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रिंकू सिंहला जर संधी द्यायची असेल, तर शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनाही भारताच्या प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर करावं लागेल.
दुखापतीमुळे हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेन्टी सिरीजचा भाग नाहीत. जेव्हा हे दोघेही भारतीय टी-ट्वेंटी संघात परततील, तेव्हा रिंकू सिंहला बेंचवर बसूनच सामना पाहावा लागेल. याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नसणार आहे. जर भारताच्या अंतिम 11 मध्ये रिंकूला खेळवायच असेल, तर विराट कोहली आणि रोहित शर्माला डावाची सुरुवात करावी लागेल.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डावाची सुरुवात केल्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर हार्दिक पांड्या, पाचव्या क्रमांकावर एक विकेटकीपर फलंदाज, सहाव्या क्रमांकावर रिंकू सिंह, सातव्या क्रमांकावर जडेजा किंवा अक्षर पटेल यापैकी एकाला संधी मिळेल. अशा प्रकारे भारतीय फलंदाजी क्रम असणार आहे. साहजिकच त्यामुळे यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल या दोघांनाही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळताना दिसत नाही.
अफगाणिस्तान विरुद्धच्या सिरीजमध्ये मात्र हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव उपलब्ध नसल्याने यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंहला खेळण्याची संधी मिळू शकते. मात्र शुभमन गिल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फिट होताना दिसत नाही. हार्दिक पांड्याचा पर्याय म्हणून शिवम दुबेला पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात संधी दिली जाऊ शकते.
हे देखील वाचा IND vs AFG 1st T20 playing 11: कितीही चांगला खेळला तरी रिंकू सिंह प्लेइंग इलेव्हनचा भाग नसणार; होय ही भारतीय संघाची मजबुरीच..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम