India vs Afghanistan T20I: केएल राहुल, ईशान किशन, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर संपुष्टात..

0

India vs Afghanistan T20I: 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन टी-ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेसाठी काल भारतीय संघाची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आली. अनेक दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवल्याने संघ निवडीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. केएल राहुल (kl Rahul) ईशान किशन (ishan Kishan) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला असला तरी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माला (Rohit Sharma) मात्र टी-ट्वेंटी संघात संधी दिली गेली आहे.

आगामी t20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ या मालिकेच्या माध्यमातून तीनच t20 सामने खेळणार आहे. त्यामुळे अफगाणिस्तान विरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेसाठी निवडलेल्या संघाला अधिक महत्व आहे. या संघातूनच आगामी टी-ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला जाणार आहे. साहजिकच त्यामुळे अनेक खेळाडूंचे टी-ट्वेंटी करिअर संपुष्ट देखील येण्याची शक्यता आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांची भारताच्या t20 संघात निवड केली असली तरी अनेक खेळाडूंना मात्र वगळण्यात आलं आहे. ईशान किशन, श्रेयस अय्यर, आणि केएल राहुल या तिघांची भारतीय संघात निवड केली नसल्याने, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. परंतु या तिघांचेही T20 आकडे फारसे चांगले नाहीत. शिवाय केएल राहुलच्या अप्रोचवर नेहमी टीका केली जाते.

याच वर्षी भारतीय संघाला टी-ट्वेंटी विश्वचषक खेळायचा आहे. 2021 आणि 2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकामध्ये भारतीय संघाच्या खेळात अप्रोचची कमतरता पाहायला मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही विश्वचषकात खेळणाऱ्या काही खेळाडूंना आता बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ज्यामध्ये केएल राहुल, श्रेयश अय्यर, ईशान किशन या तीन प्रमुख फलंदाजांचा समावेश आहे. या तीन फलंदाजाबरोबर लेगस्पिनर युझवेंद्र चहल, दीपक चाहर, आणि मोहम्मद शमीची देखील ट्वेंटी संघात निवड केली नाही.

भारतीय टी ट्वेंटी संघात संधी मिळालेल्या खेळाडूंनी जर दमदार कामगिरी केली, तर श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, मोहम्मद शमी, युझवेंद्र चहल, दीपक चहर या खेळाडूंना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. बीसीसीआय आता टी-ट्वेंटी संघात नवीन खेळाडूंना संधी देत असल्याने, या खेळाडूंचे एक प्रकारे t20 करिअर संपुष्टात देखील आल्याचं बोललं जात आहे.

असा आहे अफगाणिस्तान विरुद्धच्या ट्वेंटी सिरीजसाठी भारतीय संघ..

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार

हे देखील वाचा IND vs AFG T20: राहुल द्रविडच्या षडयंत्राचा ईशान किशन ठरला बळी; T20 World Cup मध्येही ईशान ऐवजी आता दिसणार हा फलंदाज..

AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..

Airplane Mode: आता मोबाईल flight mode वर टाकूनही करता येणार इंटरनेटचा वापर; जाणून घ्या प्रोसेस..

YouTube Income Tips: यूट्यूबच्या पॉलिसीत बदल! आता पैसे कमावणे झाले सोप्पे; जाणून घ्या सर्व निकष..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.