Airplane Mode: आता मोबाईल flight mode वर टाकूनही करता येणार इंटरनेटचा वापर; जाणून घ्या प्रोसेस..
Airplane Mode: अलीकडे अनेकजण मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाईन काम करताना पाहायला मिळतात. मात्र काम करत असताना अचानक फोन कॉल आल्याने कामात अडथळा निर्माण होतो. अनेकदा जवळच्या लोकांचे फोन कॉल असल्याने, आपल्याला ते उचलावे देखील लागतात. त्यामुळे काम रखडल्या देखील जातं. तुम्हाला या समस्येपासून सुटका हवी असेल, तर हे शक्य आहे.
आता तुम्ही तुमचा फोन फ्लाईट मोडमध्ये (flight mode) टाकूनही इंटरनेट (internet) वापरू शकता. होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. आज आपण याचविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. जेव्हा तुम्ही सुट्टीच्या दिवशी एखादा आवडता चित्रपट पाहत असता, अशा वेळी अचानक फोन येतो, आणि मग तुम्हाला बाहेर जाण्याची वेळही येते. मात्र या सगळ्यांपासून तुमची आता सुटका होणार आहे. तुम्ही मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून इंटरनेट वापरू शकता जाणून घेऊया याची प्रोसेस.
Force LTE Only (4G/5G)
या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील गुगल प्ले स्टोअरवर जावं लागणार आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर, तुम्हाला एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे. Force LTE Only असं या ॲपचे नाव आहे. Force LTE Only हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही या सुविधेचा लाभ घेऊ शकता.
Force LTE Only ॲप डाऊनलोड केल्यानंतर, तुमच्यासमोर चार पर्याय ओपन होतील. चार पायांपैकी तुम्हाला (ANDROID 11+) या पर्यायावर क्लिक करायचं आहे. METHOD2:(ANDROID 11+) क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग मधील इन्फॉर्मेशन या पर्यायावर जायचं आहे.
इन्फॉर्मेशन या पर्यायावर गेल्यानंतर रेडिओ पावर हा पर्याय पाहायला मिळेल, हा पर्याय निवडा. मोबाईल रेडिओ पावर हा पर्याय तुम्हाला इनेबल करायचा आहे. त्यानंतर तुमच्या फोन मधील फ्लाईट मोड हा ऑप्शन तुम्ही ऑन करायचा आहे. त्यानंतर तुम्ही फोन कॉल बंद होईल. आणि केवळ मोबाईल डाटा (mobile data) हा पर्याय चालू राहील. साहजिकच त्यांनतर तुम्ही इंटरनेट वापरू शकता.
हे मोबाईल एप्लीकेशन पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे तुम्ही डोळे झाकून या ॲपच्या माध्यमातून सुविधेचा लाभ घेऊ शकता. गुगल प्ले स्टोअरवर या ॲप्लिकेशनला 4.4 रेटिंग देखील दिले गेले आहे. आतापर्यंत दहा लाखाहून अधिक लोकांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केलं आहे. काही मोबाईलला मात्र हे एप्लीकेशन काम करत नाही.
हे देखील वाचा AFG vs IND T20 squad: विराट रोहितचं कमबॅक; केएल राहूल, श्रेयस अय्यरसह या तिघांचं T20 करिअर मात्र संपुष्टात..
YouTube Income Tips: यूट्यूबच्या पॉलिसीत बदल! आता पैसे कमावणे झाले सोप्पे; जाणून घ्या सर्व निकष..
UPI New rules: आता एका दिवसात करता येणार पाच लाखाचे व्यवहार आणि बरच काही; जाणून घ्या डिटेल्स..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम