SA vs IND 2nd test live: फलंदाजांच्या घोडचूकीमुळे भारताचा पराभव निश्चित; हे आहे आफ्रिकेच्या जिंकण्याचे गणित..
SA vs IND 2nd test live: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना केप टाऊन मैदानावर सुरू आहे. पहिल्या कसोटीत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. आतापर्यंत केपटाऊन मैदानावर भारतीय संघ एकदाही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळे या मैदानावर येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणं मोठं आव्हान होतं. मात्र मोहम्मद सिराजने सहा बळी टिपत दक्षिण आफ्रिकेला केवळ 55 धावात गारद केले. त्यामुळे भारत दुसरा कसोटी सामना भारत जिंकेल, असं वाटत होतं. मात्र पुन्हा या सामन्याला कलाटणी मिळाली.
मोहम्मद सिराजच्या वादळापुढे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा शिरकाव लागला नाही. मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेच्या सहा प्रमुख फलंदाजांना तंबूत पाठवले. दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ 55 धावांत संपुष्टात आला. साहजिक त्यामुळे भारतीय संघाला पहिला कसोटी सामना जिंकण्याची मोठी संधी निर्माण झाली. मात्र पुन्हा एकदा फलंदाजांनी हजेरी लावण्याचे काम कायम ठेवलं. आफ्रिके नंतर भारतही पहिल्याच दिवशी 153 धावात गारद झाला.
विशेष म्हणजे, चार बाद १५३ या धावसंख्येवरून भारत १५३ वर ऑल आउटही झाला. क्रिकेटच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले. पुन्हा एकदा विराट कोहलीची साथ देण्यासाठी मैदानावर एकाही फलंदाजाला टिकता आलं नाही. पहिल्या डावात भारताने 98 धावांचे लीड घेतले असले तरीही दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना देखील जिंकण्याची शक्यता आहे.
अनेकांना यावर विश्वास बसणार नाही, मात्र भारतीय फलंदाजी या मालिकेत प्रचंड कमजोर वाटत आहे. दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या दिवसा अखेर तीन बाद 62 धावा केल्या आहेत. अद्यापही दक्षिण आफ्रिकेचा संघ 36 धावांनी पिछाडीवर आहे. जर दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 150 धावांच्या आसपासचे टार्गेट दिले, तर दक्षिण आफ्रिका दुसरा कसोटी सामना जिंकण्याची दाट शक्यता आहे.
63 धावसंख्येवरून पुढे खेळताना दक्षिण आफ्रिकेने जर 250 धावांपर्यंत मजल मारली, तर मात्र भारतीय संघावर दुसरा कसोटी सामना देखील गमावण्याची नामुष्की ओढवली जाईल. गोलंदाजांनी दमदार कामगिरी करून देखील फलंदाजांच्या नालायकपणामुळे भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना गमवावा लागण्याची दाट शक्यता आहे.
विराट कोहली (Virat kohli) वगळता भारताचा एकही फलंदाज आत्मविश्वासाने फलंदाजी करताना पाहायला मिळत नाही. जर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावामध्ये दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केलं, आणि भारतासमोर 150 धावांचे आव्हान दिले, तर भारतीय संघाचे फलंदाज दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे पुन्हा लोटांगण घालताना पाहायला मिळतील.
हे देखील वाचा Men women relationship: पुरुष आणि महिला दोघांचे वीक पॉईंट माहिती असायलाच हवे; जाणून घ्या दोघांचेही वीक पॉईंट..
NHM Pune Recruitment: आरोग्य विभागात या उमेदवारांसाठी मेगा भरती; वाचा सर्व डिटेल्स..
mutton: मटणाचा हा भाग आहे सर्वात चविष्ट; एका वेळी किती मटण खायला हवं?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम