Vivek Bindra vs Sandeep Maheshwari: बिंद्रा आणि माहेश्वरीच्या वादाचे नेमके कारण हादरून टाकणारे; जाणून घ्या दोघांचा वाद आणि कारण..
Vivek Bindra vs Sandeep Maheshwari: विवेक बिंद्रा (Vivek Bindra) हे नाव लोकांना गेल्या काही दिवसात माहिती झालं, असं अजिबातच नाही. जे लोक युट्युब वापरतात, त्यांना विवेक बिंद्रा नक्कीच माहिती असेल. विवेक बिंद्राने युट्युबवर मोटिवेशनल व्हिडिओ टाकून अनेकांना प्रेरित, प्रभावित केलं. काही तासांत बिंद्राच्या व्हिडिओला अनेक मिलियन्समध्ये न्यूज मिळायच्या. मात्र आता हा माणूस फ्रॉड असल्याचे समोर आले आहे.
विवेक बिंद्राचे स्कॅम संदीप माहेश्वरीने (Vivek Bindra vs Sandeep Maheshwari) समोर आणलं असलं तरी. विवेक बिंद्रा एक्सपोज व्हायला तो स्वतः ही तितकाच जबाबदार आहे. संदीप माहेश्वरी (sandeep Maheshwari) आणि विवेक बिंद्रा कोण आहेत? या दोघांमध्ये नेमका वाद काय आहे हे जाणून घेऊ सविस्तर..
संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा (Sandeep Maheshwari vs Vivek Bindra) मोटिवेशनल स्पीकर आहेत. Youtube च्या माध्यमातून लोकांना मोटिवेट करण्याचे काम ते करत असतात. दोघांच्याही व्हिडिओंना मिलियन्समध्ये व्ह्यूजही मिळतात. संदीप माहेश्वरी यांनी मोटिवेशनल व्हिडिओ नंतर, त्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या लोकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. हा प्रोग्राम देखील प्रचंड लोकप्रिय झाला.
संदीप माहेश्वरी यांनी आता “बिझनेस मास्टरी” ( business mastery) ही सिरीज काढली. ही सिरीज च्या माध्यमातून तरुणांना बिजनेसचे धडे आणि त्यांचे अनुभव शेअर केले जातात. आता याच सिरीजमधील एक व्हिडिओ बिंद्रा आणि माहेश्वरी यांच्या वादाचे कारण ठरलाय.
बिझनेस मास्टरी” या सिरीजमध्ये दोन तरुणांनी त्यांना आलेला अनुभव शेअर केला. ज्यामध्ये ते म्हणतात, एक प्रसिद्ध यूट्यूबर आहेत. त्यांनी बिझनेस कोर्सच्या नावाखाली माझ्याकडून पन्नास हजार रुपये घेतले. या कोर्सचा मला काहीही फायदा झाला नाही. दुसऱ्या एका तरुणाने माझ्याकडूनही 35 हजार रुपये घेतल्याचे सांगितले.
आम्ही ही रक्कम परत मागितली. मात्र रक्कम परत करण्याची कोणतीही पॉलिसी इथे नाही. तुम्हाला रक्कम परत हवी असेल, तर तुम्ही हा कोर्स इतरांना विकून टाका असं सांगण्यात आलं. हा सगळा अनुभव त्यांनी बिजनेस मास्टर या सिरीजमध्ये शेअर केला. या सगळ्या प्रकरणावर संदीप माहेश्वरी यांनी हा मोठा स्कॅम असल्याचं म्हटले. हा प्रकार आणखी लोकासोबत झाला असेल. हे आपल्याला उघड करावं लागेल हेही ते या व्हिडिओत सांगत आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणाचेही नाव घेतले नव्हते.
बिझनेस मास्टरी सिरीजमधील हा संपूर्ण व्हिडिओ युट्युबवर पोस्ट केल्यानंतर, विवेक बिंद्राने एक पोस्ट करत संदीप माहेश्वरी यांना टार्गेट केले. व्हिडिओतून तुम्ही हा स्कॅम माझा आणि माझ्या कंपनीशीचा म्हटला. मी तुमच्याशी खुलेपणाने चर्चा करायला तयार आहे. वास्तवाशी तुमचा सामना करायची तयारी आहे का? असाही सवाल त्यांनी विचारला. त्यानंतर या दोघांच्या वादाला सुरुवात झाली.
विवेक बिंद्रा यांच्या पोस्टनंतर संदीप माहेश्वरी यांनीही एक पोस्ट केली. त्यात ते लिहतात, विवेक बिंद्रा यांच्या तीन चुका, आम्ही पोस्ट केलेल्या व्हिडिओत कोणाचेही नाव घेतलं नाही. व्हिडिओ केवळ जनजागृतीसाठी होता.
काहीही कारण नसताना माझ्या घरी आणि ऑफिसमध्ये त्यांनी त्यांची लोकं पाठवायला सुरुवात केली. ही त्यांची दुसरी चूक. बिंद्रा काहीतरी बालिश वर्तन करण्याचा प्रयत्न करतायत, ही त्यांची तिसरी मोठी चूक ठरणार आहे.
माहेश्वरीच्या टीम कडून अशा प्रकारची पोस्ट करून विवेक बिंद्रा यांना एकप्रकारे डीवचचण्यात प्रयत्न करण्यात आला. आता यानंतर सोशल मीडिया आणि बातम्यांमधून विवेक बिंद्रा आणि माहेश्वरी हा वाद trending चा टॉपिक बनलाय.
हे देखील वाचा IND vs SA: या खेळाडूचे करिअर उध्वस्त व्हायला विराट कोहली जबाबदार; हर्षा भोगलेच्या ट्विटने खळबळ, कारणही सांगितलं..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम