IND vs SA: या खेळाडूचे करिअर उध्वस्त व्हायला विराट कोहली जबाबदार; हर्षा भोगलेच्या ट्विटने खळबळ, कारणही सांगितलं..
IND vs SA: केवळ भारताचाच नाही, तर जगातला सर्वोत्तम व्हॉईट बॉल क्रिकेटर म्हणून विराट कोहलीच (Virat Kohli) नाव प्रामुख्याने घेतलं जातं. विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) रेकॉर्ड देखील मोडीत काढले आहे. केवळ शतके आणि धावांच्या बाबतीतच नाही, तर संघाच्या विजयातही विराट कोहलीचा सिंहाचा वाटा आहे. विराट कोहलीवर गेल्या काही वर्षात सातत्याने टीका होताना पाहायला मिळते. परंतु या टीकेला काहीही बेस नसतो. हेही दिसून आले आहे. अशीच टीका आता विराट कोहलीवर हर्षा भोगले यांनी केली आहे. (Harsha bhogle on Virat Kohli)
विराट कोहली आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्यास पात्र होत नाही, असेही अनेक जण बोलत आहेत. खरंतर टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारताकडून खेळताना अखेरच्या चार षटकात सर्वाधिक षटकार लगावण्याचा रेकॉर्ड हा विराट कोहलीच्या नावावर आहे. T20 मध्ये सर्वाधिक सरासरी देखील त्याच्या नावावर आहे. 2022 मध्ये झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये प्लेयर ऑफ द सिरीजचा मानकरी विराट कोहली ठरला होता. भारताकडून त्याने सर्वाधिक धावाही केल्या होत्या. मात्र असं असलं तरी आता आगामी t20 वर्ल्ड कपमध्ये त्याला संधीही मिळणार नसल्याचं बोललं जात आहे.
दक्षिण आफ्रिके विरुद्ध भारताने तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना जिंकत मालिका आपल्या खिशात घातली. या सामन्याचा सामनावीर संजू सॅमसन (Sanju Samson) ठरला. त्याने आपल्या कारकीर्दीतले पहिले शतक झळकावले. इतर खेळाडू अपयशी होत असताना, संत खेपट्टीवर त्यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केलं. या शतकिय खेळी नंतर त्याचं अनेक दिग्गजांकडून कौतुक करण्यात येत आहे. समालोचक हर्षा भोगलेने (Harsha bhogle) संजू सॅमसनचे कौतुक करताना एक ट्विट केलं, ज्यामुळे आता नवा वादही निर्माण झाला आहे.
संजू सॅमसनचे कौतुक करताना हर्षा भोगले म्हणाला, संजू हवी तिथे फलंदाजी करतो. मात्र तिसरा क्रमांक हा त्याच्यासाठी सर्वोत्तम क्रमांक आहे. यावर मात्र चाहते चांगलेच संतापले. तिसरा क्रमांक हा विराट कोहलीचा क्रमांक आहे. तुला विराट कोहलीला काढून टाकायचे आहे का? असा सवाल चाहत्यांनी विचारला. यावर हर्षा भोगलेने स्पष्टीकरणही दिले आहे.
विराटच्या चाहत्यांना उत्तर देताना हर्षा भोगले म्हणाला, आपल्याकडे नंबर तीनचा सर्वोत्तम फलंदाज आहे. जोपर्यंत विराट आहे, तोपर्यंत तिसऱ्या क्रमांकावर त्याचाच हक्क आहे. हा नंबर त्याच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही. मला फक्त संजू सॅमसनसाठी तिसरा क्रमांक हा सर्वोत्तम क्रमांक आहे. हेच सांगायचं आहे. यापूर्वी देखील हर्षा भोगलेने विराट कोहलीला टार्गेट करणारं ट्विट केलं होतं. हर्षा भोगले विराटच्या अगेन्स बोलतानाही अनेकदा पाहायला मिळतो.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम