Virat Kohli South Africa tour: त्या कारणासाठी विराट मालिका सोडून परतला भारतात; असा असेल आफ्रिकेविरूद्ध पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ..
Virat Kohli South Africa tour: एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी (IND vs SA test series) सज्ज झाला आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध दोन कसोटी सामन्याच्या मालिकेला बॉक्सिंग डे (boxing day test) म्हणजेच 26 डिसेंबर पासून सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने या मालिकेला महत्त्व आहे. मात्र अशातच विराट कोहलीच्या (Virat Kohli) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. विराट अचानक दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतला आहे.
विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेमधून विश्रांती घेतली होती. विराट बरोबर रोहित शर्माने (Rohit Sharma) देखील दक्षिण आफ्रिकेचा t20 आणि एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेतली. त्यामुळे भारताच्या नवोदित खेळाडूंचा संघ दक्षिण आफ्रिकेत पाठवण्यात आला. या संघाने दमदार कामगिरी देखील केली. टी-ट्वेंटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर मात्र सीनियर खेळाडू कसोटी मालिका खेळणार आहेत.
विराट हा भारतीय संघाचा खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. विराट कोहलीचे असंख्य चाहते आहेत. मैदानावर त्याला खेळताना अनेकांना पाहायचं असतं. त्यामुळे विराट ज्या सामन्यात खेळत नाही, तो सामना पाहणाऱ्यांची संख्या देखील कमी झाल्याचे पाहायला मिळते. विराट अचानक कौटुंबिक कारणामुळे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आला. त्यामुळे कसोटी मालिकेत विराट खेळणार की नाही याविषयी चाहते संभ्रमात आहेत.
विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा सध्या प्रेग्नेंट आहे. साहजिकच त्यामुळे तिची काळजी अधिक घेतली जात आहे. कौटुंबिक कारणामुळे विराट दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतला असला, तरी नेमकं कारण अधिकृतरित्या समोर आलं नाही. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार अनुष्का शर्माच्या प्रेग्नेंसी टेस्टिंगच्या कारणामुळे विराट अचानक भारतात परतला असल्याचं सांगण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा दौरा सोडून विराट भारतामध्ये परतला असला तरी तो 26 तारखेला होणाऱ्या कसोटी सामन्यात सहभागी होणार आहे. पहिला कसोटी सामना खेळण्यासाठी विराट दक्षिण आफ्रिकेत दाखल होईल. सध्या भारत दक्षिण आफ्रिका विरुद्ध सराव सामना खेळत आहे. विराट कोहलीला मात्र सराव सामन्याचा भाग होता येणार नाही.
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेमध्ये अद्याप कसोटी मालिका जिंकलेली नाही. दोन कसोटी सामन्याची मालिका जिंकण्याची मोठी संधी भारतीय संघाकडे असणार आहे. चेतेश्वर पुजारा अजिंक्य रहाणे या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडेही अनेकांचे लक्ष असेल.
यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाडची कसोटी संघात निवड केली असती तरी सलामीला रोहित शर्मा आणि शुभमन गिल हेच असतील. असा असेल पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ; रोहित शर्मा, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमहरा
हे देखील वाचा Mahela Jayawardene On Rohit Sharma: हार्दिक पांड्याच्या निवडीवर कोच जयवर्धनेने सोडलं मौन; अजब तर्क आणि कारण देत म्हणाला..
Acharya Chanakya thought: या सात जणांना झोपेतून चुकूनही उठवू नका; सहावा आहे, फारच भानायक..
Flipkart Sale: 50MP कॅमेरा असलेला Motorola चा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 8,499 रुपयांत..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम