Flipkart Sale: 50MP कॅमेरा असलेला Motorola चा दमदार स्मार्टफोन मिळतोय केवळ 8,499 रुपयांत..

0

Flipkart Sale: कमी किमतीत अनेकांना दर्जेदार स्मार्टफोन खरेदी करायचा असतो. मात्र अनेकदा हे शक्य होत नाही. स्मार्टफोन खरेदीवर आता अनेक कंपन्या दमदार डिस्काउंट देतात. मात्र योग्य वेळी या डिस्काउंटची माहिती मिळत नसल्याने, आपण डिस्काउंटमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्यापासून वंचित राहतो. जर तुम्हाला देखील दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत दमदार स्मार्टफोन खरेदी करायचा असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

जर तुम्ही दमदार कॅमेरा आणि चांगल्या स्टोरेजचा स्मार्टफोन खरेदी करू इच्छित असाल, तर मोटोरोला हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. मोटोरोलाच्या स्मार्टफोनवर फ्लिपकार्टवर दमदार डिस्काउंट देण्यात येत आहे. Motorola G14 असं या स्मार्टफोन नाव आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत बारा हजार 999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन तुम्हाला 34% डिस्काउंटमध्ये खरेदी करता येत आहे. म्हणजेच, तुम्हाला हा स्मार्टफोन फक्त आठ हजार 499 रुपयांत मिळतोय.

यापेक्षाही स्वस्तात हा स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करायचा असेल, तर एक्सचेंज ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही हा स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करू शकता. 50MP कॅमेऱ्या बरोबर 4 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज देखील या स्मार्टफोनमध्ये देण्यात आले आहे. Axis Bank कार्डव्दारे या स्मार्टफोनचे पेमेंट केले, तर तुम्हाला पाच टक्के कॅशबॅक देखील देण्यात येणार आहे. याशिवाय तुम्ही 299 रुपये हप्त्यासह ईएमआयद्वारे देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

फीचर्स/ स्पेसिफिकेशन

कंपनीने या बजेट स्मार्टफोनमध्ये तब्बल 6.5 इंचाचा LCD डिस्प्ले दिला आहे. जो फुल एचडी+ रिझोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एकदम स्लिम आणि स्टाइलीश असा आहे. 4 GB रॅम तसेच 128 GB स्टोरेजसह हा फोन ग्राहकांना देण्यात आला आहे.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या स्मार्टफोनचा कॅमेरा दमदार आहे. या फोनला LED फ्लॅश लाईटसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP प्रमुख ते 2 MP मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी साठी 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी देखील दमदार आहे. 5000mAh आणि 20W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

हे देखील वाचा Rohit Sharma In CSK: दिल्लीच्या पदरी निराशा! रोहित आता चेन्नई कडून खेळणार? चेन्नईकडून खुलासा..

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

Rohit Sharma vs MI: हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्सला BCCI ची चपराक; रोहित शर्मावर घेतला हा मोठा निर्णय..

Anushka Sharma pregnancy: या महिन्यात होणार ज्युनिअर विराटचं आगमन; अनुष्काने व्हिडिओ पोस्ट करत दिली माहिती..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.