Rohit Sharma In CSK: दिल्लीच्या पदरी निराशा! रोहित आता चेन्नई कडून खेळणार? चेन्नईकडून खुलासा..

0

Rohit Sharma In CSK: काल दुबईमध्ये (Dubai) आगामी आयपीएल लिलाव (ipl auction) प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. मुंबई इंडियन्सने (mumbai Indians) या आयपीएल लिलाव प्रक्रियेमध्ये सर्वाधिक प्रभावित केले. आयपीएल लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर, आता आजपासून ट्रेड विंडो (trade window) ओपन झाली आहे. ट्रेड विंडो आयपीएल सुरू होण्याच्या 30 दिवस अगोदर बंद करण्यात येईल. तोपर्यंत खेळाडूंना कोणत्याही संघामध्ये ट्रेड करता येणार आहे.

हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मुंबई इंडियन्सचा कर्णधार घोषित करण्यात आले. तेव्हापासून मुंबई इंडियन्स, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा (Rohit Sharma) ट्रेडिंगवर आहेत. रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर, मुंबई इंडियन्सचे अनेक चाहते नाराज देखील आहेत. केवळ चाहतेच नाही, तर खेळाडू देखील नाराज असल्याचं पाहायला मिळालं. जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) यांनी तर उघडपणे आपली नाराजी बोलून देखील दाखवली. याशिवाय मुंबई इंडियन्सच्या एकाही खेळाळूने हार्दिक पांड्या कर्णधार झाल्याच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यानंतर रोहित शर्माला ट्रेड करण्यासंदर्भात अनेक संघांनी मुंबई इंडियन्सशी संपर्क केला. यामध्ये दिल्ली कॅपिटल संघाने आपण संपर्क केला असल्याचं कबूल देखील केलं. मात्र मुंबई इंडियन्सने आम्ही रोहित शर्माला ट्रेड करण्यास इच्छुक नसल्याचे मुंबईने सांगितलं असंही त्यांनी सांगितले. त्यानंतर ट्रेड विंडो बंद झाली. काल लिलावानंतर आजपासून ट्रेंड विंदो पुन्हा सुरू झाली आहे.

दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा रोहित शर्माला आपल्या संघात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे बोललं जात असतानाच, यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने उडी घेतली. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून इच्छित नाही. रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सला आपल्याला ट्रेड व्हायचं असल्याचेही सांगितलं आहे, अशी असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईला रोहित शर्माला ट्रेड करावं लागेल.

महेंद्रसिंग धोनीचा 2024 हा अखेरचा आयपीएल सीझन असेल. त्यानंतर चेन्नईला एका नव्या कर्णधाराची आवश्यकता आहे. अशावेळी रोहित शर्मा आणखी तीन-चार सीजन कर्णधार म्हणून आपली जबाबदारी पार पाडू शकतो. त्यामुळे चेन्नई सुपर किंग संघाने देखील रोहित शर्माला ट्रेडसाठी अप्रोच केल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये सत्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मात्र आता चेन्नई सुपर किंग्स संघाकडून, या संदर्भात स्पष्टीकरण आले आहे.

ट्रेड विंडोच्या माध्यमातून रोहित शर्माला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स उतरल्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाची निराशा झाली, असं बोललं जात होतं. मात्र आता चेन्नई कडून याविषयी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. चेन्नईच्या संघ व्यवस्थापकाने रोहित शर्माला आमच्या संघात घेण्यासाठी आम्ही कोणत्याही चर्चा केल्या नाहीत. ट्रेड करण्यासाठी आमच्याकडे खेळाडू नसल्याचे देखील चेन्नईकडून सांगण्यात आलं आहे. रोहित शर्मा आता नेमकं कोणत्या संघाकडून खेळतो, हे पाहणं चाहत्यांसाठी औत्सुक्याचे ठरवणार आहे.

हे देखील वाचा Mumbai Indians: IPL Auction मध्ये कमाल केल्याने, मुंबई विजेतेपदाची दावेदार; रोहितच्या जाण्यानेही नाही पडणार फरक, पाहा संघ..

Chanakya Niti On Money: चाणक्यांच्या या चार गोष्टी माहिती नसतील, तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊच शकत नाही..

IPL 2024 captain: मुंबईसह चार संघाच्या कर्णधार पदामध्ये मोठा उलटफेर; जाणून घ्या दहाही संघाचे कर्णधार..

Rohit Sharma left MI: अखेर रोहितचं ठरलं! रोहीत शर्मासाठी या दोन संघांनी पैसे ठेवले राखून; या पद्धतीने होणार डील..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.