Dawood Ibrahim: अखेर दाऊद इब्राहिमचा विष देऊन खात्मा? कोणी दिले विष? कसा झाला मृत्यु? वाचा सविस्तर..

0

Dawood Ibrahim: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याचा सूत्रधार आणि संपूर्ण जगात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून परिचित असणारा दाऊद इब्राहिमचे पर्व अखेर संपुष्टात आले आहे. दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असल्याच्या बातमीचे नेहमी खंडन करणाऱ्या पाकिस्तानचं पितळही आता उघडं पडलं आहे. दाऊद इब्राहिमला विष देऊन ठार मारण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे.

मीडिया रिपोर्ट नुसार दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये असून त्याच्यावर विषबाधा करण्यात आली आहे. विषबाधा करण्यामध्ये जवळच्या लोकांचाच सहभाग असल्याची माहितीही आहे. दाऊद इब्राहिमवर कराची मधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम मृत देखील पावला, अशी माहिती आहे. मात्र याविषयी अधिकृत स्पष्टता करण्यात आली नाही. पाकिस्तान मधील सर्व इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याने, या बातमीत तथ्य असल्याचे देखील बोलले जात आहे.

अनेक मीडिया रिपोर्टनुसार दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्यामुळेच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र असलं तरी याविषयी अधिकृत रिपोर्ट सादर करण्यात आलेला नाही. काही मीडिया रिपोर्ट नुसार दाऊद इब्राहिमला रुग्णालयात दाखल केलं, हे खरं आहे. मात्र तो साधारण आजारी असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. तर काही मीडिया रिपोर्ट नुसार रुग्णालयात दाखल करण्याचे कारण विष प्राशन हेच असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दाऊद इब्राहिम 1993 मध्ये मुंबई हल्ल्याचा सूत्रधार आणि डी-कंपनीचा प्रमुख आहे. मुंबईमध्ये करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात 250 हून अधिक लोकांचा बळी घेतला गेला. मात्र तेव्हापासून त्याने आपले वास्तव्य पाकिस्तानमध्ये केले. पाकिस्तानने दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्ये आहे, या बातमीचे वेळोवेळी खंडन केलं. आता मात्र पाकिस्तानचे हे पितळ उघड पडलं आहे.

दाऊद इब्राहिम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर तो पाकिस्तानमध्ये असल्याचे सिद्ध झालं आहे. पाकिस्तानला या विषयी स्पष्टीकरण द्यावे लागणार असल्याने, संपूर्ण पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार विषबाधा होऊन काही तासानंतर दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाला असल्याचंही म्हटलं आहे. मात्र काही मीडिया रिपोर्टने याविषयी अधिकृत माहिती समोर आली नसल्याचं सांगितले आहे.

हे देखील वाचाIPL auction 2024 Live: उद्या ठरणार रोहित शर्माचं भवितव्य; जाणून घ्या या तीन शक्यता..

mental health: ही चार लक्षणे सांगतात तुम्ही आतुन तुटलेले, अन् केवळ बाहेरूनच आहात आनंदी..

SJVN Limited Recruitment 2023: SJVN मध्ये या उमेदवारांसाठी विविध पदांच्या 400 जागांची भरती.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.