Sleeping Positions And Relationship: नात्याची पोलखोल करतात झोपण्याच्या या पाच पद्धती; जाणून घ्या झोप आणि नात्याचा थेट संबंध..

0

Sleeping Positions And Relationship: प्रेम, सन्मान, विश्वास याशिवाय पती-पत्नीचं नातं फार काळ टिकणे अशक्य आहे. आपण पाहतो कपल अनेक प्रकारे प्रेम व्यक्त करतात. कधी संवादातून, कधी डोळ्यात पाहून, कधी एकमेकांना मिठी मारून, सुंदर गिफ्ट देऊन देखील प्रेम व्यक्त केले जाते. मात्र याशिवाय झोपेच्या प्रकारातून देखील एकमेकांविषयी किती प्रेम, सन्मान आहे हे देखील स्पष्ट होते.

रात्री तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत कोणत्या स्थितीत झोपता यावरून तुमच्या दोघांचे एकमेकांविषयी किती प्रेम आहे, हे समजते. कदाचित हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटू शकते. मात्र एका संशोधनानुसार याविषयी स्पष्टता करण्यात आली आहे. जाणून घेऊया झोपण्याच्या पद्धती आणि नात्याचा संबंध

स्पून स्लीपिंग

अनेकांची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला पाठीमागून मिठी मारून झोपत असाल, तर झोपेच्या या पद्धतीला स्पून स्लीपिंग असं म्हटलं जातं. जर तुम्ही देखील तुमच्या जोडीदाराला पाठीमागून मिठी मारून झोपत असाल, तर ही पोझिशन अधिक प्रेम आणि जबाबदारी दर्शवणारी आहे. पाठीमागून घट्ट मिठी घालून झोपणाऱ्या जोडीदाराला तुमच्याकडून सुरक्षितता हवी असते.

बॅक टू बॅक

तुम्ही आणि तुमचा जोडीदार दोघेही एकमेकांविरोधात तोंड करून झोपता त्या पोझिशनला बॅक टू बॅक स्लीपिंग पोझिशन म्हटलं जातं. जर तुम्ही देखील अशाप्रकारे झोपत असाल, तर दोघांनाही नात्यांमध्ये स्वातंत्र्य हव असल्याचे सांगितले जाते. झोपेची ही पद्धत नात्यामध्ये दोघांनाही मोकळीक हवी असल्याचे सांगते.

स्टारफिश स्लीपिंग 

दोघांपैकी एक जोडीदार बेडवरील अधिक जागा घेऊन झोपत असेल, तर या झोपण्याच्या पद्धतीला स्टारफिश स्लीपिंग असं म्हटलं जातं. जर तुमचा जोडीदर किंवा तुम्ही या स्लीपिंग पोझिशनमध्ये झोपत असाल, तर ही स्लीपिंग पोझिशन तुमच्या नात्यांमध्ये अधिकारशाही असल्याचं दर्शवते. जो व्यक्ती बेडवरील अधिक जागा घेऊन झोपतो, तो व्यक्ती तुमच्यावर प्रत्येक निर्णय आणि अधिकार गाजवतो.

फेस टू फेस

पती-पत्नी किंवा कपलमध्ये सर्वाधिक प्रेम विश्वास आणि सन्मान अधोरेखित करणारी स्लीपिंग पोझिशन म्हणजे फेस टू फेस स्लीपिंग पोझिशन होय. या पोझिशनमध्ये दोन्ही जोडीदार एकमेकांकडे तोंड करून झोपतात. या स्लीपिंग पोझिशन चा अर्थ नात्यांमध्ये दोघेही प्रचंड भावनिक असल्याचं दर्शवतात. दोघांमध्ये निखळ आणि मुक्त संवाद असल्याचे सांगितले जाते. दोघेही शारीरिक जवळीक साधण्यासाठी तितकेच आतुर आणि उत्सुक असल्याचेही ही स्लीपिंग पोझिशन दर्शवते.

हे देखील वाचा IND vs NZ: भारत-न्युझीलंड सेमी फायनलवर पाऊसाचे सावट; सामना रद्द झाला तर काय? जाणून घ्या सविस्तर..

Flipkart big Diwali sale 2023: Samsung चे 4 महागडे smartphone Flipkart वर मिळतायत फक्त 13 हजारांत..

 

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.