Shikhar Dhawan video: शिखर धवनला आला पत्नीचा फोन; रडत माफी मागत म्हणाली..”; धवनने व्हिडीओही केला शेअर..

0

Shikhar Dhawan video: भारताचा स्टार सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या भारतीय क्रिकेट पासून दूर आहे. फक्त क्रिकेट पासूनच नाही, तर तो सध्या आपल्या कुटुंबासोबतही राहत नाही. तो आपल्या पत्नीपासून वेगळा झाला असून, सध्याचा काळ त्याच्यासाठी क्रिकेट आणि परिवारासाठी देखील अनुकूल नाही. अशातच आता पत्नीच्या माफीचा व्हिडिओ शिखर धवन शेअर केला आहे.

आयशा मुखर्जी (Ayesha Mukherjee) सोबत शिखर धवन 2012 मध्ये विवाह केला होता. विवाहापासून दोघांना झोरावर नावाचा एक मुलगा आहे. सध्या शिखर धवनची पत्नी आणि मुलगा ऑस्ट्रेलियामध्ये राहत आहे. दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. त्यामुळे शिखर धवनही आता सिंगल लाईफ एन्जॉय करताना पाहायला मिळतोय.

शिखर सोशल मीडियावर कमालीचा ऍक्टिव्ह असतो. इंस्टाग्राम रिल्सच्या माध्यमातून तो अनेक नवनवीन व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी अपलोड करताना दिसून येतो. खासकरून मजेशीर व्हिडिओ तो इंस्टाग्राम अकाउंट वरून नेहमी पोस्ट करत असतो. नुकताच त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

शिखर धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओत तो म्हणत आहे, आज मला पत्नीचा फोन आला होता. रडत होती. माफी मागत होती. म्हणाली सॉरी बाबू, तु जसं म्हणशील, तसं मी करेन. तू जसं ठेवशील, तसं मी राहीन. पण तू घरी ये. तिचं बोलणं ऐकून माझं देखील मन भरून आलं.

माहीत नाही, कोणाची पत्नी होती. पण मस्त होती. देव सगळ्यांना अशी पत्नी देवो. अशा प्रकारचा मजेशीर व्हिडिओ शिखर धवनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केला आहे. शिखर धवनची पत्नी सध्या त्याच्या सोबत राहत असल्याने, सुरुवातीला अनेकांना शिखर धवनला त्याच्याच पत्नीचा फोन आल्याचं वाटलं. मात्र हा व्हिडिओ त्याने गंमत म्हणून बनवला आहे. जो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

हे देखील वाचा IND vs ENG: हार्दिक पांड्याच्या दुखपतीविषयी मोठी अपडेट; इंग्लंड विरुद्ध खेळणार की नाही? Playing 11 झाली स्पष्ट..

IND vs NZ: दमदार कामगिरीनंतर शमीचा रोहित शर्माला टोला; म्हणाला संधी दिली तर..

Chanakya Niti for women: या तीन गोष्टीत महिला नेहमी पुरुषावर गाजवतात हुकूमत; पुरुष या बाबतीत महिलांच्या आसपासही नाहीत..

Sexual relationship : संबंधासाठी ही वेळ आहे घातक; जाणून घ्या कारण आणि संबंधाची योग्य वेळ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.