Google Pay loan : आता तुम्हीही घेऊ शकता Google pay loan; या 8 स्टेप्स फॉलो करा, लागलीच मिळेल लोन..

0

Google Pay loan : जर तुम्ही Google pay UPI वापरत असाल, तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे. गुगल पे ॲपच्या माध्यमातून तुम्ही आता लोन घेऊ शकता. Google pay ने याविषयी माहिती दिली आहे. Google pay app माध्यमातून तुम्ही पंधरा हजार रुपयाचे लोन सुलभ हप्त्यासह घेऊ शकता. या लोनची परतफेड करण्यासाठी तुम्हाला 111 रुपये प्रति महिना रक्कम भरावी लागणार आहे.

जर तुम्हाला गुगल पे वरून लोन हव असेल, तर तुमचे Google Pay for Business या ॲपवर अकाऊंट असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. Google Pay for Business या ॲपवर अकाउंट काढून, तुम्ही पंधरा हजार रुपयांपर्यंतचे loan घेऊ शकता. छोट्या व्यापाऱ्यांना या सुविधेचा लाभ व्हावा, यासाठी गुगल पे ने डीएम आय फायनान्स (DMI Finance) सोबत आपली भागीदारी केली आहे.

असे मिळावा कर्ज..

तुम्हाला गुगल पे वरून लोन हवं असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम “गुगल प्ले फॉर बिजनेस” हे ॲप डाऊनलोड करून खाते उघडावे लागणार आहे. त्यानंतर गुगल प्ले फॉर बिजनेस” या ॲप मधील loan या विभागात जाऊन “ऑफर्स” या पर्यायावर क्लिक करा.

ऑफर्स या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला कर्जाची जी रक्कम हवी आहे, ती निवडावी लागणार आहे. कर्जाची रक्कम निवडल्यानंतर तुम्हाला बरोबर “Get start” या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर नवीन पेज ओपन होईल. त्यावर तुम्हाला तुमच्या गुगल पे वरील वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे.

त्यानंतर समोरील रखान्यामध्ये तुम्हाला कर्जाची रक्कम, किती कालावधीसाठी कर्ज हवं आहे? त्याचबरोबर तुम्हाला कर्जाचा रिव्ह्यू देखील करावा लागणार आहे. त्यांनतर केवायसी डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहेत. त्यानंतर पडताळणी करून पुढील प्रोसेस केली जाणार आहे.

त्यांनतर तुम्हाला EMI करण्यासाठी “Setup eMandate” यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कर्ज मिळणार आहे. तुम्हाला मिळालेले कर्ज हप्त्याची स्थिती तुम्ही Google Pay for Business AAP च्या my loan या विभागात जाऊन पाहू शकता.

हे देखील वाचा Physical relationship tips: चाळीशीनंतरही तीच ताकद, उत्साह कायम ठेवायचा असेल तर या चार गोष्टी करा..

Namo Shetkari Yojana: राज्य सरकारच्या नमो योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी होणार जमा; नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरण

WC 2023 semi final scenario: भारत, न्युझीलंड नंतर तिसरा semifinalist मिळाला; इंग्लंडला किती संधी? वाचा सविस्तर..

Jaggery Purity : तुम्ही खरेदी करत असलेला गूळ भेसळयुक्त आहे की नाही हे कसं ओळखाल? घ्या जाणून..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.