india vs australia odi: अश्विनच्या समावेशानंतर टीम इंडियाच्या playing11 मध्ये झाला हा मोठा बदल; या दोन खेळाडूंना बसावं लागणार बाहेर..
india vs australia odi: आशिया चषक (Asia Cup2023) जिंकल्यानंतर भारतीय संघाचे लक्ष आगामी विश्वचषकाकडे आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिन एकदिवसीय सामन्याची मालिका खेळायची आहे. विश्वचषकाच्या दृष्टीने या मालिकेला प्रचंड महत्व आहे. तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात जवळपास दोन वर्षानंतर रविचंद्रन अश्विनचा (ravichandran Ashwin) संघात समावेश करण्यात आला आहे.
आशिया चषक स्पर्धेत अक्षर पटेल दुखापत झाल्याने, तो आता आगामी विश्वचषकासाठी मुकण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. त्यामुळे अक्षर पटेलच्या जागेवर ऑफ स्पिनर ऑल राऊंडर रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करण्यात आला आहे. संघात रविचंद्रन अश्विनचा समावेश करण्यात आल्याने, आता भारताच्या अंतिम अकरामध्ये दोन बदल निश्चित मानले जात आहेत.
जवळपास प्रत्येक संघाकडे एक दर्जेदार ऑफ स्पिनर आहे. मात्र भारतात अनेक स्टार ऑफ स्पिनर असून देखील एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळवलं जात नाही. यावर्षी विश्वचषक भारतात होणार असल्याने, फिरकीपटू महत्त्वाचा रोल पार पाडणार आहेत. साहजिकच त्यामुळे दोन जलदगती गोलंदाज, हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि तीन स्पिनर अशी प्लेइंग-11 घेऊन भारतीय संघ मैदानात उतरू शकतो. अश्विन आणि रवींद्र जडेजा फलंदाजी देखील करू शकत असल्याने ही शक्यता अधिक गडद झाली आहे.
आश्विनमुळे भारतीय संघ या दोन फॉर्म्युल्यासह मैदानात उतरणार..
तीन स्पिनर घेऊन मैदानामध्ये उतरणे अवघड वाटत असले, तरी भारतीय खेळपट्ट्यांवर हे शक्य आहे. महत्त्वाचं म्हणजे, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा दोघेही चांगली फलंदाजी करत असल्याने, याच फॉर्म्युल्यासह भारत आपली अंतिम अकरा घेऊन मैदानात उतरणार असल्याचं बोललं जातंय. ज्या खेळपट्टीवर जलदगती गोलंदाजाला मदत असेल, तिथे मात्र अश्विनच्या जागेवर शार्दुल ठाकुरचा (shardul Thakur) संघात समावेश केला जाईल.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यात शार्दुल ठाकूरला खेळण्याची संधी मिळू शकते. त्याचं कारण म्हणजे हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) पहिल्या दोन सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) देखील पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यात नसल्याने, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा हे दोन फिरकीपटू अंतिम अकरामध्ये पाहायला मिळणार आहेत.
हे देखील वाचा AUS vs IND: Virat Kohli च्या आरामाचे आकडे पाहून तुमचेही डोळे फिरतील; का दिला जातोय विराटला आराम..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम