IND vs AUS ODI series: विराट, रोहित, हार्दिकच्या विश्रांतीचा निर्णय भोवणार; Asia Cup मध्ये उणीवा भरून निघाल्या, पण आता स्वतः च खोदला मोठा खड्डा..
IND vs AUS ODI series: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यासाठी विराट कोहली (Virat Kohli) हार्दिक पांड्या (Hardik Pandya) रोहित शर्मा (Rohit Sharma) कुलदीप यादव (Kuldeep Yadav) या चौघांना विश्रांती देण्यात आली आहे. विश्वचषक (world Cup 2023) सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला केवळ तीन एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. मात्र तरी देखील सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध घोषित करण्यात आलेल्या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक बदल केल्याने, अनेक क्रिकेट दिग्गजांकडून टीका होत आहे. भारतीय संघाला विश्वचषक सुरू होण्यापूर्वी केवळ तीनच सामने खेळायचे आहेत. विश्वचषकापूर्वी भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांना आणखीन सरावाची आवश्यकता होती. परंतु भारतीय संघाने ही संधी गमावली. हा निर्णय अंगलट देखील येण्याची शक्यता आहे.
ऑक्टोंबरमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकात जो भारतीय संघ आपली अंतिम अकरा घेऊन मैदानात उतरणार आहे. त्याच खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत देखील खेळण्याची अधिक संधी मिळायला हवी होती. परंतु सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीने घेतलेला हा निर्णय भारतीय संघासाठी फायदेशीर नसल्याचं मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
कुठलाही विजय हा संघासाठी महत्त्वाचा असतो. विजयामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास वाढत असतो. विश्वचषकामध्ये खेळणारा संघच या मालिकेत उतरला असता, तर आणखीन उणीवा भरून काढता आल्या असत्या. अशिया कप स्पर्धेमध्ये (asia Cup 2023) भारतीय संघातील काही उणीवा भरून निघाल्या. मात्र काही उणीवा अजूनही तशाच आहेत. अशातच आता सीनियर खेळाडूंच्या विश्रांतीमुळे भारतीय संघात नवीन समस्या उद्भवणार आहेत.
विश्वचषकामध्ये भारताची मदार विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या या तिघांवर मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय संघातील मिडल ऑर्डर गेल्या काही वर्षात सातत्याने अपयशी ठरला आहे. फिनिश्वर म्हणून हार्दिक पांड्याने ठीकठाक कामगिरी केली आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याला फिनिशिंग टच देण्याची आणखीन संधी मिळाली असती. मात्र ही संधी आता हुकली आहे.
दुसरीकडे विराट कोहली, रोहित शर्मा, हे खेळाडू देखील लेफ्टआर्म स्पेसर पुढे अपयशी ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या संघात देखील डावखुरा जलदगती गोलंदाज आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीला डावखुऱ्या जलदगती गोलंदाजाला खेळण्याची आणखीन संधी मिळाली असती. ती संधी देखील आता हुकली आहे. भारतीय संघाला जर ही मालिका गमवावी लागली, तर भारतीय संघाचा आत्मविश्वास देखील कमी होणार आहे. याचा फटका विश्वचषकात बसू शकतो.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम