Babar Azam: Asia Cup मधून बाहेर होताच पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा; ..म्हणून बाबर शाहीन आफ्रिदी एकमेकांना भिडले; पाहा व्हिडिओ..

0

Babar Azam: सुपर4 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान (PAK vs SL) यांच्यामध्ये खेळले गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तान संघाला धूळ चारली. आणि फायनलमध्ये प्रवेश केला. पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या परभवा नंतर पाकिस्तान संघाचे आशिया स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र हा पराभव पाकिस्तान संघाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. परभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये बाबर आझम (Babar Azam) आणि शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) एकमेकांना भिडले. (Babar Azam Shaheen Afridi video)

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar Azam) प्रत्येक सामन्यानंतर रेसिंग रूममध्ये आपल्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी स्पीच देत असतो. पराभव किंवा विजय झाला तरी बाबर आजम सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये स्पीच देत असतो. 2022 मध्ये झालेल्या T20 विश्वचषक फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर देखील त्याने खेळाडूंना संबोधित केले होते.

आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेतून बाहेर गेल्यानंतरही बाबर आझमने ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना संबोधित केले. खेळाडूंना बोलताना बाबर आझम म्हणाला, आपण जर स्वतःला सुपरस्टार म्हणून घेत असेल, तर महत्त्वाच्या सामन्यात परफॉर्मन्स करण्याची जबाबदारी आपली आहे. सिनियर खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारून चांगला खेळ करणे आवश्यक असल्याचे तो म्हणाला.

बाबर आझमच्या बोलण्याचा रोख शाहीन आफ्रिदीकडे असल्याचं आता समोर आलं आहे. बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदी या दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मतभेद असल्याचं बोललं जातं. शाहीन आफ्रिदीला एकदिवसीय क्रिकेट संघाचे कर्णधार पद हवं आहे. शाहीन आफ्रिदीने आपल्या नेतृत्वात पाकिस्तान टी-ट्वेंटी स्पर्धा जिंकल्यानंतर, त्याच्या महत्वकांक्षा वाढल्याचं बोललं जातं. त्यातच शाहिद आफ्रिदी हा त्याचा सासरा असल्याने, शाहीन बाबर आझम नंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार होण्याच्या अधिक शक्यता आहेत.

बाबर आझम ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना बोलताना म्हणाला, सीनियर खेळाडू स्वतःला स्टार म्हणून घेत असतील, तर महत्वाच्या सामन्यात त्यांनी परफॉर्मन्स करणं फार आवश्यक आहे. हे बोलत असताना शाहीन आफ्रिदीने त्याला मध्येच थांबवलं. पुढे शाहीन आफ्रिदी म्हणाला, ज्या खेळाडूंनी परफॉर्मन्स केला आहे, त्यांचं तरी कौतुक कर. त्यानंतर या दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. काही खेळाडूंनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला.

हे देखील वाचा IND vs SL Asia Cup final: एवढा माज बरा नाही..! गिलने ती मागणी करताच रोहित म्हणाला, अजिबात नाही, मूर्ख आहेस का; पाहा व्हिडिओ..

IND vs SL Asia Cup final: एवढा माज बरा नाही..! गिलने ती मागणी करताच रोहित म्हणाला, अजिबात नाही, मूर्ख आहेस का; पाहा व्हिडिओ..

Asia Cup 2023 Final: भारताने स्वतःच्याच पायावर धोंडा मारला! श्रीलंकेला पराभूत करणं आता अशक्य; जाणून घ्या फायनलचं गणित..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.