MS Dhoni Bike Riding Video: किती तो साधेपणा, रस्त्याने जाताना चक्क धोनीने तरुणाला दिली टू-व्हीलरवर लिफ्ट; पाहा व्हिडिओ..
MS Dhoni Bike Riding Video: भारताचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) साधेपणाची ओळख नाही, असा शोधूनही सापडणार नाही. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नावलौकिक मिळवून देखील धोनी कधीही लाईम लाईटमध्ये राहत नाही. महेंद्रसिंग धोनी प्रसिध्दी पासून नेहमी लांब राहिला असला तरी सोशल मीडियावर त्याच्या साधेपणाचे व्हिडिओ नेहमी व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (MS Dhoni Viral video)
महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटच्या मैदानावर अनेक करिश्मे करून दाखवले आहेत. टी-ट्वेंटी विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी या आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केवळ महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. अनेक नवीन खेळाडू महेंद्रसिंग धोनीकडून क्रिकेटचे धडे घेताना पाहायला मिळतात.
काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत गोल्फ खेळताना दिसला होता. सामान्य ते ग्लोबल लोकांना भेटताना देखील महेंद्रसिंग धोनीचे इमोशन, रिएक्शन सारखीच असते. महेंद्रसिंग धोनीच्या या साधेपणामुळे त्याचे कौतुक होतं. असाच एक व्हिडिओ सध्या तुफान वायरल झाला आहे.
धोनी अनेकदा रांचीच्या रस्त्यांवरून एकटा टू-व्हीलर, फोर व्हीलर घेऊन फिरताना पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी क्रिकेटची प्रॅक्टिस आटपून टू-व्हीलरवर घरी जाण्यासाठी निघाला. घरी जात असताना, त्याने चक्क एका तरुण मुलाला आपल्या टू व्हीलरवर लिफ्ट दिली.
धोनीने लिप्ट दिलेल्या तरुणाने हा व्हिडिओ आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आहे. मोबाईलमध्ये कैद केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. महेंद्रसिंग धोनीने लिफ्ट दिलेला तरुण देखील क्रिकेट प्रॅक्टीस करत होता. महेंद्रसिंग धोनीने ज्या मैदानावर प्रॅक्टिस केली. त्याच मैदानावर हा मुलगा देखील प्रॅक्टिस करत होता.
MS Dhoni gave a lift to a young cricketer from Ranchi on his bike.
A lovely gesture by MS….!!! pic.twitter.com/2gDQIKBQMh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 15, 2023
महेंद्रसिंग धोनी जाताना तरुणाने धोनीला लिफ्ट मागितली. महेंद्रसिंग धोनीने देखील त्याला लिफ्ट दिली. महेंद्रसिंग धोनीच्या या साधेपणाचे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दहा लाख लोकांनी पाहिला आहे.
हे देखील वाचा Rekha Viral video: ..म्हणून सेल्फी मागायला गेलेल्या चाहत्यांच्या रेखाने वाजवली कानाखाली; पाहा व्हिडिओ..
India vs Bangladesh: भारत फायनल जिंकणार की नाही? आजचा सामनाच ठरवणार..
Benefits of Raisins: तुम्हीही खाताय मनुके? मग हे एकदा वाचाच..
PAK vs SL: दोन्हीं संघांनी 252 धावाच केल्या, मग श्रीलंकेला का विजयी घोषित केले? घ्या जाणून..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम