Asia Cup 2023 India squad: ..म्हणून चहलची निवड केली नाही; अजित आगरकरच्या उत्तराने दिग्गजांचा संताप..
काल आशिया स्पर्धेसाठी (Asia Cup 2023) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आशिया चषक स्पर्धेसाठी 17 खेळाडूंची निवड करण्यात आली. संजू सॅमसनची (Sanju Samson) स्टॅन्ड बाय प्लेयर म्हणून निवड करण्यात आली असली तरी वर्ल्डकप खेळण्याचे त्याचे स्वप्न भंगले आहे. संजू सॅमसन बरोबर भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलची (yuzvendra chahal) देखील भारतीय संघात निवड करण्यात आली नसल्याने, आता अनेकांनी या निवडीवर टीका केली आहे.
अजित आगरकर (Ajit agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली काल निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) देखील उपस्थित होता. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित आगरकरने भारतीय संघाची घोषणा केली. संघाची घोषणा केल्यानंतर, अजित आगरकरने पत्रकारांशी संवाद साधला.
चहलला भारतीय संघात संधी का मिळाली नाही, हा प्रश्न अजित आगरकरला विचारला. या प्रश्नाचे अजित आगरकरने अजब उत्तर दिलं. अपेक्षाप्रमाणे भारतीय संघात तिलक वर्माचा (Tilak Varma) समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याबरोबरच केएल राहुल आणि श्रेयस अय्यर (kl Rahul and shreyas Iyer) या दोघांचे देखील भारतीय संघात दीर्घकाळानंतर पुनरागमन झाले आहे. साहजिकच त्यामुळे वर्ल्डकप संघ (World Cup 2023) निवडताना तिलक वर्माचा देखील पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
चहलला भारतीय संघात संधी मिळाली नाही. याविषयी बोलताना अजित आगरकर म्हणाले, आम्ही भारतीय संघात दोन लेगस्पिनर निवडू शकत नसल्याने, चहलला भारतीय संघात संधी मिळाली नाही. दुसरीकडे मात्र रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल, हे दोन लाईक टू लाईक खेळाडू अजित आगरकरने भारतीय संघात निवडले. यावर दिग्गजांनी बोट ठेवलं.
जर तुम्ही भारतीय संघात दोन लेगस्पिनर निवडून शकत नाही, तर तुम्हाला दोन लेफ्टआर्म स्पिनर खेळाडू कसे चालतात, असा सवाल उपस्थित केला गेला. एवढेच नाही, तर कुलदीप यादव हा लेगस्पिनर नाही, तो चायनामन गोलंदाज आहे. सुनील गावस्करसह अनेकांनी यावर देखील प्रकाश टाकला. मात्र ते पुढे बोलताना म्हणाले, आता आपल्याला या संघाला सपोर्ट करायचा आहे.
Jio recharge Plans: जियोचे दोन भन्नाट प्लॅन! Netflix चे Subscription मोफत आणि 3GB डेटा प्रतिदिन..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम