India squad for Asia Cup: दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात केएल राहुल खेळणार नाही; फीट नसतानाही राहुलच्या निवडीवर रोहित शर्माचे अजब वक्तव्य..

0

India squad for Asia Cup: काल अशिया चषक (asia Cup 2023) स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. आगामी विश्वचषक (world Cup 2023) डोळ्यासमोर ठेवून अजित आगरकर (ajit agarkar) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवड समितीने हा संघ जाहीर केला. मात्र आता संघ निवडीवरून वादाला तोंड फुटले आहे. काही नवख्या खेळाडूंना भारतीय संघात समावेश करण्यात आला. मात्र काही स्टार खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवल्याने, आता संघ निवडीची जोरदार चर्चा रंगली आहे.

30 ऑगस्ट पासून आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी फारच सुमार राहिली. श्रीलंका आणि पाकिस्तान संघाने भारताला पराभवाची धूळ चारली. आणि भारतीय संघाचे आशिया चषक स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न भंगले. आता पुन्हा एकदा भारतीय संघाला जिंकण्याची संधी असली, तरी अशिया स्पर्धा जिंकणं भारतीय संघासाठी मोठं आव्हान देखील असेल.

केएल राहुल (kl Rahul) आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हे दोन फलंदाज बऱ्याच महिन्यांपासून भारतीय संघाचा भाग नाहीत. मात्र आता या दोघांचेही आशिया चषक स्पर्धेत पुनरागमन झाले आहे. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे. मात्र अजूनही केएल राहुल पूर्णपणे फिट झालेला नाही. केएल राहुलला निगल दुखापत असल्या कारणाने पहिल्या सामन्यात खेळणार नाही. अशी माहिती देखील पत्रकार परिषदेत अजित आगरकरने दिली.

केएल राहुल विषयी बोलताना रोहित शर्माने (rohit sharma) देखील धक्कादायक वक्तव्य केले आहे. संघ निवडीसाठी आमच्याकडे फार ऑप्शन नव्हते. सहाजिकच त्यामुळे आमच्याकडे जे ऑप्शन होते, त्यांचीच आम्ही निवड केली असल्याचं रोहित शर्मा म्हणाला. राहुल पूर्णपणे फिट नसला तरी, त्याने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.

केएल राहुल पूर्णपणे फिट नसताना देखील त्याची आशिया चषक स्पर्धेत निवड केली गेली आहे. आशिया चषक स्पर्धा ही एकदिवसीय स्वरूपात खेळायचे आहे. म्हणजेच त्याला 50 षटके विकेटकीपिंग आणि फलंदाजी देखील करावी लागणार आहे. अशावेळी तो स्वतःला किती फिट ठेवतो, हा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. जर तो पूर्णपणे फिट नव्या तर त्याची निवड का केली गेली? असा प्रश्न दिगज्जांनी उपस्थित करत निवड समितीवर ताशेरे ओढले आहेत.

आशिया चषकसाठी भारतीय संघ..

रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, टिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, इशान किशन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, संजू सॅमसन (स्टँड बाय)

हे देखील वाचा Chanakya Niti on husband wife: चाणक्यांनी सांगितलेकी ही धोरणे पाळा; पती-पत्नीमध्ये वाद होणारही नाही..

Jio recharge Plans: जियोचे दोन भन्नाट प्लॅन! Netflix चे Subscription मोफत आणि 3GB डेटा प्रतिदिन..

Chanakya Niti for Women: या स्त्रियांशी जवळीक केली, तर आयुष्य उध्वस्त होण्यापासून कोणीच वाचवू शकणार नाही..

face beauty tips: तुम्हीही रात्री चेहरा न धुता झोपता? जाणून घ्या चेहरा धुवून झोपण्याचे आश्चर्यकारक फायदे..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.