IND vs IRE 1ST T20: या तीन खेळाडूंना वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवण्याची ही शेवटची संधी; आयर्लंड विरुद्ध आज पहिला टी ट्वेंटी सामना..

0

IND vs IRE 1ST T20: वेस्टइंडीज विरुद्ध झालेला पाच सामन्याच्या मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे भारतीय संघाला मालिका कमवण्याची वेळ आली. आता पुन्हा एकदा नव्या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला आयर्लंड विरुद्ध 3 t20 सामन्याची मालिका खेळायची आहे. या मालिकेतला पहिला सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. (IND vs IRE 1ST T20)

आगामी विश्वचषकासाठी अद्याप भारतीय संघ जाहीर झालेला नाही. आयर्लंड विरुद्ध मालिका पार पडल्यानंतरच, भारतीय संघ जाहीर होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक खेळाडूंकडे भारतीय संघात स्थान मिळवण्याची मोठी संधी असणार आहे. जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाताखाली भारतीय संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे देखील महत्त्वाचं असणार आहे.

आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या तीन टी ट्वेन्टी सामन्याच्या मालिकेसाठी अनेक नवीन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष करून या मालिकेत संजू सॅमसन (Sanju Samson) तिलक वर्मा (Tilak Varma) यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah) या खेळाडूंकडे अनेकांचे लक्ष असणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन झाले आहे. आगामी विश्वचषकाच्या (WORLD CUP 2023) दृष्टीने जसप्रीत बुमराहची गोलंदाजी महत्वाचा फॅक्टर असणार आहे.

वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या पाच टी-ट्वेंटी सामन्याच्या मालिकेत संजू सॅमसनने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केला नाही. वेस्टइंडीज विरुद्धची मालिका संजू सॅमसनसाठी साधारण राहिली. मात्र दुसरीकडे तीलक वर्माने आपला जलवा दाखवत विश्वचषकाच्या संघात माझा देखील विचार व्हावा, निवड समितीला हा विचार करणे भाग पाडले आहे.

वेस्टइंडीज दौऱ्यावर यशस्वीला 4 T20 सामने खेळण्याची संधी मिळाली. मात्र एक सामना वगळला, तर इतर सामन्यात तो सपशेल अपयशी ठरला. आता पुन्हा एकदा यशस्वीला तीनही सामन्यात सलामीला येण्याची संधी मिळणार आहे. यशस्वी बरोबर ऋतुराज गायकवाड सलामीची भूमिका पार पाडणार आहे.

आशिया चषक स्पर्धेसाठी (Asia Cup 2023) 15 ऑगस्टला भारतीय संघाची निवड करण्यात येणार होती. मात्र आयर्लंड मालिकेनंतर, खेळाडूच्या कामगिरीचा विचार करून आशिया चषक स्पर्धेचा आणि वर्ल्ड कपचा देखील संघ निवडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आली.

चौथ्या क्रमांकासाठी तिलक वर्माची निवड भारताच्या एकदिवसीय विश्वचषक संघात केली जाणार असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल या दोन फलंदाजांचा देखील विचार होणार आहे. मात्र तीनही t20 सामन्यात हे तीनही फलंदाज कशी कामगिरी करतात, यावर सगळं काही अवलंबून असेल.

असा असेल भारतीय संघ..

यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, जस्प्रीत बुमराह (कॅप्टन)

हे देखील वाचा Women nature Tips: महिलांच्या केसाच्या लांबीवरून ओळखता येतो स्वभाव; वाचा अधिक..

almond benefits: सद्गुरूंनी सांगितले दारूपेक्षाही जास्त यकृतताला घातक आहेत बदाम; बदाम खात असाल तर पाहिले हे वाचा..

ODI World Cup: भारत सेमीफायनलिस्ट, पण फायनल याच दोन संघात रंगेल; सेहवागने स्पष्टच सांगितले भारत फायनलमध्ये न जाण्याचे कारण..

Atal Pension Yojana: दर महिन्याला भरा फक्त 210 रुपये,आणि वर्षाला मिळावा 60 हजार; जाणून घ्या केंद्राची ही भन्नाट योजना..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.