WI vs IND 5th T20: एक धमाकेदार खेळी, अन् यशस्वीची थेट वर्ल्ड कप संघात एन्ट्री? अजित आगरकर सोबतचे घनिष्ट संबंध पथ्यावर..
WI vs IND 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies T20 series) यांच्यामध्ये खेळलेल्या चौथ्या T20 सामना भारताने एकहाती जिंकत मालिकेत 2-2 अशी बरोबर साधली. गेल्या तीनही सामन्यात भारतीय सलामी जोडी अपयशी ठरली होती. त्यामुळे सुरुवातीच्या दोन्ही t20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र तिसऱ्या T 20 सामन्यात सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) या दोघांनी केलेल्या दमदार खेळाचे जोरावर भारतीय संघाला विजय साकारता आला.
चौथ्या टी-ट्वेन्टी सामन्यात वेस्टइंडीज संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात वेस्टइंडीज संघाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. एकीकडे वेस्टइंडीज संघाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले असले, तरी दुसरीकडे शिमरॉन हेटमायरने (shimron hetmyer) आपला झुंझावात कायम ठेवला. आणि वेस्ट इंडीज संघाला 178 धावा उभारण्यात यश मिळवून दिलं.
179 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या भारतीय सलामीवीरांनी सामना आपल्या बाजूने झुकवत, भारताला एकहाती विजय मिळवून दिला. लागोपाठ दोन्हीं सामन्यात अपयशी ठरलेल्या यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) चौथ्या सामन्यात तुफानी फटकेबाजी करत 51 चेंडूत नाबाद 84 धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याला सामनावीर पुरस्कार देखील मिळाला.
वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत यशस्वी जयस्वालने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरुवात केली. पहिल्याच कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने पदार्पणात 171 धावांची खेळी केली होती. एकदिवसीय मालिकेत त्याला संधी मिळाली नाही, मात्र टी ट्वेंटीमध्ये त्याने पुन्हा आपला झंझावात कायम ठेवत, आगामी विश्वचषकाच्या संघात आपला दावा ठोकला आहे.
5 सप्टेंबर पासून भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. आता विश्वचषक संघात बॅकअप सलामीवीर म्हणून यशस्वी जयस्वाची निवड होणार असल्याची शक्यता आहे. यशस्वीने काल खेळल्या गेलेल्या सामन्यात धमाकेदार खेळी साकारल्याने, आता त्याचा आगामी विश्वचषकाच्या पंधरा सदस्याच्या संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.
आगामी विश्वचषकामध्ये भारताच्या संघात यशस्वी जयस्वालचा सहभाग व्हायला हवा, असं अनेक दिग्गजांनी देखील म्हंटले आहे. विश्वचषकाच्या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि शुभमन गिलला पसंती दिली असली, तरी बॅकअप सलामीवीर म्हणून यशस्वीची निवड करण्यास हरकत नाही, असं मत अनेक भारतीय माजी दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केले आहे.
तिलक वर्मा आणि यशस्वीचा सहभाग
श्रेयस अय्यर (shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे भारतीय क्रिकेटचा भाग गेल्या काही महिन्यांपासून नाहीत. आशिया चषक (asia Cup 2023) स्पर्धेत या दोघांचं पुनरागमन होईल, असं बोललं जात आहे. मात्र याविषयी अद्याप अधिवृत माहिती मिळाली नाही.
जरी हे दोघे आशिया चषक स्पर्धेमध्ये परतले, तरी देखील या दोघांचा फॉर्म कसा राहतो? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या दोघांऐवजी तिलक वर्मा आणि यशस्वीचा देखील भारतीय एकदिवसीय संघात सहभाग केला जाणार असल्याची माहिती आहे. निवड समिती चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि यशस्वीचे चांगले संबंध असल्याचा मोठा यशस्वीला होणार असल्याचं बोललं जात आहे. कसोटी क्रिकेटच्या निवडी विषयी देखील हे समीकरण पाहायला मिळाले होते.
हे देखील वाचा Newly marriage Tips: नवीन लग्न झालेल्या पुरुषांनी अशा प्रकारे खा कांदा आणि मेथी एकत्र; त्यासाठी मिळतील हे अनगिनत फायदे..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम