Prithvi Shaw Double Century: 244 धावांची वादळी खेळी साकारत पृथ्वीचा वर्ल्ड कप संघावर दावा; पाहा व्हिडिओ..
Prithvi Shaw Double Century: 244 गेल्या काही वर्षापासून भारताचा स्टार ओपनर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आपल्या खराब फॉर्ममुळे टीम इंडिया (team India) पासून दूर आहे. IPL 2023 मध्ये देखील त्याला चमक दाखवता आली नाही. दिल्ली कॅपिटल संघाने खराब फॉर्ममुळे त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. आपल्या फॉर्म परत येण्यासाठी पृथ्वी इंग्लंडमध्ये एकदिवसीय चषक खेळत आहे. अशातच आता पृथ्वी शॉ आणि त्याच्या चाहत्यांसाठी इंग्लंडमधून एक चांगली बातमी आली आहे. (Prithvi Shaw Double Century)
नॉर्थम्पटनशर (Northamptonshire) संघाकडून एकदिवसीय क्रिकेट सामना खेळताना पृथ्वीने तब्बल 244 धावांची वादळी खेळी साकारली. कोणत्याही घरेलू क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. गेल्या दीड दोन वर्षापासून पृथ्वीची बॅट फारशी तळपली नव्हती. साहजिकच त्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचा भाग देखील त्याला बनवण्यात आलं नव्हते.
काही महिन्यांपूर्वी क्रिकेटमुळे नाही, तर एका वेगळ्याच कारणामुळे पृथ्वी शॉ चर्चेत आला होता. एका रील स्टार सोबत पृथ्वीच्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर त्याच्यावर मारहाणी प्रकरणी गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर पृथ्वीचे क्रिकेटकडे लक्ष नसल्याची टीका करण्यात आली. आता मात्र टीकाकारांना आपल्या बॅटमधून त्याने प्रतिउत्तर दिलं आहे.
5 ऑक्टोंबर ते 19 नोव्हेंबर यादरम्यान भारतामध्ये वन डे विश्वचषक खेळला जाणार आहे. पृथ्वीने केलेली तुफान खेळी देखील आता निवड समितीला लक्षात ठेवून, विश्वचषकासाठी संघ निवडावा लागणार आहे. एकीकडे शुभमन गिल, ईशान किशन हे सलामीवीर देखील लईत नाहीत. सलामीवीर म्हणून ‘पृथ्वी शॉ’ची देखील निवड केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्त्वाच्या क्षणी ‘पृथ्वी शॉ’ने खेळलेली ही इनिंग आता जगभरात वाऱ्यासारखी पसरली आहे. तो नॉर्थम्पटनशर संघाकडून खेळत आहे. केवळ तिसऱ्याच सामन्यात त्याने ही वादळी खेळी साकारली आहे. 153 चेंडू 244 धावांच्या या वादळी खेळीमध्ये पृथ्वीने तब्बल 28 चौकार आणि अकरा उत्तुंग षटकार लगावले. विशेष म्हणजे, घरेलू क्रिकेटमध्ये पृथ्वीचे हे दुसरं द्विशतक आहे. यापूर्वी देखील त्याने असा कारनामा केला आहे.
DOUBLE HUNDRED FOR PRITHVI SHAW
204* off 131 balls with 25 fours & 8 sixes against Somerset
📷: onedaycup #CricketTwitter #Cricket
— Niche Sports (@Niche_Sports) August 9, 2023
पृथ्वी शॉने 2021 मध्ये विजय हजारे ट्रॉफी मध्ये 227 धावांची खेळी साकारली होती. गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममधून जात असलेल्या ‘पृथ्वी शॉ’साठी ही खेळी संजीवनी मानली जात आहे. 153 चेंडूत 244 धावांच्या या वादळी खेळीमध्ये त्याने पाहिले शतक 81 चेंडूत साजरे केले. तर दुसरं शतक पूर्ण करण्यासाठी त्याने केवळ 48 चेंडू घेतले.
हे देखील वाचा IND vs WI 3rd T20I: अर्धशतक अपुरे राहिल्याने तिलक वर्माने हार्दिकसोबत हातही मिळवला नाही; पाहा व्हायरल व्हिडिओ..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम