Utkarsha Pawar: ऋतुराजची बायकोही आहे क्रिकेटर, लग्नामुळे माझ्या करिअरवर ..”; धोनी आणि करिअरवर स्पष्टच बोलली उत्कर्षा पवार..
Utkarsha Pawar: चेन्नई सुपर किंग संघाचा (CSK) स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांची पत्नी उत्कर्षा पवार (Utkarsha Pawar) ही देखील क्रिकेटर आहे. अनेकांना हे माहीत नाही, मात्र उत्कर्षा पवार प्रोफेशनल करिअर म्हणून क्रिकेटकडे पाहत आहे. काही महिन्यांपूर्वी ऋतुराज गायकवाड सोबत उत्कर्ष पवार हिने लग्न केलं. लग्नामुळे आपल्या क्रिकेट करिअरवर काय परिणाम होईल,याविषयी स्पष्ट टी स्पष्ट बोलली आहे. एका यूट्यूब चैनलला दिलेल्या मुलाखतीत उत्कर्षाने आपले करिअर आणि क्रिकेट विषयीच्या इतर मुद्द्यांवर देखील सविस्तर भाष्य केले आहे. (Utkarsha Pawar on Cricket Career)
अलीकडच्या काळात महिला संदर्भात परिस्थिती बदलली असली तरी अजूनही फार मोठा बदल झाला आहे, असं नाही. लग्नानंतर बऱ्याच मुलींना आपल्या करिअरवर विरजण टाकून घरकाम करावं लागतात. ऋतुराज गायकवाडची पत्नी उत्कर्षा पवार हिला देखील या प्रश्नाला सामोरे जावं लागलं आहे. एका युट्युब चॅनलने घेतलेल्या मुलाखतीमध्ये तिला देखील तिच्या करिअर विषयी प्रश्न विचारण्यात आला.
आपल्या करिअरवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उत्कर्षा पवार म्हणाली, लग्न झालं असलं तरी देखील मी माझं करिअर सुरूच ठेवणार आहे. जोपर्यंत माझे शरीर मला साथ देत आहे, तोपर्यंत मी क्रिकेट खेळत राहणार आहे. एक दिवस भारतीय महिला क्रिकेट संघाची कॅप माझ्या डोक्यावर असेल, असा मला दोनशे टक्के विश्वास वाटतो. ऋतुराजने देखील मला स्वातंत्र्य दिले असल्याने हा प्रवास सुखकर होणार आहे.
उत्कर्षा हिने क्रिकेटर ऋतुराज गायकवाड सोबत ३ जूनला पुण्यामध्ये मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित विवाह केला. पवार हिने आतापर्यंत 39 लिस्ट ए सामने खेळले आहेत. यामध्ये तिने 28 विकेट्स घेतल्या आहेत. तर 45 T20 सामन्यांमध्ये 26 गडी बाद केले आहेत. उत्कर्षा जहीर खानला आपला आदर्श मानते.
लग्नानंतर माझ्या जवळच्यांनी त्रास दिला…
माझं लग्न झाल्यानंतर, माझ्या करिअर संदर्भात मला अनेकांनी त्रास दिला. घरातल्या लोकांनी नाही, परंतु बाहेरच्या आणि जवळ असणाऱ्या लोकांनी तुझा करिअरचं काय होणार? याविषयी मला नकारात्मक देखील केलं. माझे आई-वडिल आणि ऋतुराजच्या घरचे देखील मला नेहमी करिअर बाबत प्रोत्साहन देत राहतात.
धोनीवर केले मोठं भाष्य…
या वर्षी झालेल्या आयपीएल फायनलनंतर उत्कर्षा पवार महेंद्रसिंग धोनीला देखील भेटली. धोनी विषयी बोलताना उत्कर्षाने धोनी बद्दल अनेक स्तुतिसुमने उधळली. धोनीचा सेन्स ऑफ ह्युमर कमालीचा आहे. त्याच्या इतका नम्र आणि जमिनीशी जोडला गेलेला खेळाडू मी माझ्या आयुष्यात पहिला नाही. माणूस इतका सक्सेस फुल होऊन देखील आपला साधेपणा आणि समोरच्याशी तितक्याच नम्रपणे बोलतो, हे मला सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट आहे.
हे देखील वाचा IND vs WI 3rd T20: टीलवममेंट म्हणून पांड्या निघाला भिकारडा; हार्दिकच्या त्या कृत्यावर चाहत्यांचा संताप..
love or lust relationship: प्रेम की वासना? मुली हे इशारे करत असतील तर समजून जा तिची इच्छा झालीय..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम