सुनेच्या मृत्यूच्या धक्याने सासुलाही हृदयविकाराचा धक्का; संपूर्ण गाव रडले.
एकीकडे आपण सासू सूनांमधील वाद विवाद पहात आलो आहे. सासूचा सासरवास तर सर्वत्र परिचित आहे, यातून कितीतरी सुनांना अापला जीव गमवावा लागला आहे. नेहमी सासूच्या छळाच्या बातम्या येत असतात. परंतु साकेगाव मध्ये याउलट एक घटना घडली आहे, ती म्हणजे सुनेचा मृत्यू झाला हा धक्का सासूला सहन झाला नाही आणि सासूला हृदयविकाराचा धक्का आला; त्यामुळे सासुचीही प्राणज्योत मालवली.
४८ वर्षीय रंजनाबाई सुरेश मनोरे यांना एका शस्त्रक्रियेसाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान शस्त्रक्रिया दरम्यान १० ऑक्टोबर रोजी त्यांचा मेत्यू झाला. ही बातमी त्याच्या ६५ वर्षीय सासूला समजली. त्यांची प्रकृती अचानकच खालावली व त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. एकाच वेळी एकाच कुटुंबातील सासू सुनेचा अंत्यविधी करण्यात आला.
सासू सुनेच्या प्रेमाची ही वेगळीच कहाणी आपल्याला पाहायला मिळाली. एकीकडे नव वधूचा छळ आपण पहिला असेल, त्याचबरोबर म्हाताऱ्या झालेल्या सासूला न सांभाळणारी सून देखील आपण पाहिले असेल. पण अशा सासुसूनाचे प्रेम हे क्वचितच पाहायला मिळेल.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम