Politics News: या योजनेतून नागरिकांना छत्री, चपल जोड, महिलांना साडी देणार; मुख्यमंत्र्यांची अजब घोषणा..

0

Politics News: निवडणुका जवळ आल्या की घोषणाचा पाऊस पडतो. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मात्र कधीकधी लोकांना खुश करण्यासाठी आपण अशा काही घोषणा करतो, ज्यामुळे आपलंच हसू होतं. असाच काहीसा प्रकार मध्य प्रदेशचे (MP Election 2023) मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान CM Shivraj Singh Chouhan यांच्यासोबत घडला आहे. नागरिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी उपस्थित लोकांना खुश करण्यासाठी एक भलतीच योजना घोषित केली.

एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले, सरकारची सगळ्यात जास्त गरज ही गरिबांना असते. आणि म्हणून राज्यातला गरीब लोकांना कोणत्याही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी आम्ही ‘चरण पादुका योजना’ (charan paduka yojana) राबवत आहोत अशी घोषणा केली. या सभेत त्यांनी अशा काही घोषणा केल्या, ज्यामुळे सोशल मीडियावर शिवराज सिंह चौहान यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यांच्या सभेचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसामुळे अनेकांना कामावरून भिजत जावं लागतं. पावसामुळे अनेक समस्या निर्माण होतात, आणि म्हणून छत्री घेण्यासाठी आम्ही प्रत्येकाच्या अकाउंटला दोनशे रुपये पाठवण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. दोनशे रुपयांबरोबरच नागरिकांना चप्पल आणि महिलांना साडी देखील घरपोच मिळणार असल्याचं अजब वक्तव्य त्यांनी केले.

लोकांची उडवली थट्टा

शिवराज सिंग चौहान यांनी चरण पादुका योजना घोषित करून आपल्याच राज्यातील जनतेचा अपमान केला असल्याची टीका होताना पाहायला मिळत आहे. लोकांना छत्री, चप्पल, आणि साडी घ्यायला पैसे नाहीत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लोकांना काही द्यायचंच असेल, तर जीवन आवश्यक वस्तूंची उपलब्धता सहज व्हावी, यासाठी उपाययोजना करणे मुख्यमंत्र्यांनी आवश्यक होतं. मात्र निवडणुका जवळ आल्या की लोकांना खुश करण्यासाठी अशा फालतू घोषणा केल्या जात आहेत. अशी टीका देखील केली जात आहे. लोकांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी चरण पादुका योजना सुरू केली, मात्र या योजनेमुळे त्यांना जोरदार ट्रोल केले जात आहे.

हे देखील वाचा Bhuvneshwar Kumar: या कारणामुळे भुवनेश्वर कुमारला नाईलाजाने घ्यावा लागला निवृत्तीचा निर्णय..

Astrology: ..म्हणून लग्नाच्या अगोदरच हे लोक बनतात प्रचंड श्रीमंत..

Google Pixel 7: Google चा हा दमदार स्मार्टफोन केवळ दहा हजारांत विकत घेण्याची संधी; जाणून घ्या ऑफर..

SSC JE Recruitment 2023: SSC अंतर्गत या उमेदवारांसाठी तब्बल 1324 रिक्त जागांची भरती; लगेच करा अर्ज..

Rohit Sharma: ..म्हणून भारत वर्ल्डकप जिंकण्यास लायक नाही; पहिल्याच सामन्यात झाल्या कधीही भरून न निघणाऱ्या या चुका..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.