Electric Scooter: कमी किंमतीत दमदार इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जवर 200 किमी रेंज, किंमत केवळ..
Electric Scooter: इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. साहजिक त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना प्रचंड मागणी वाढली आहे. पेट्रोलवर धावणाऱ्या टू-व्हीलर गाड्यांवर ऑफिसला जाणं आता अनेकांना परवडेनासे झाले आहे. साहजिकच त्यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक टू व्हीलर खरेदीकडे वळले आहेत. मात्र अजूनही इलेक्ट्रिक टू-व्हीलरच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने, अनेकांना पेट्रोलच्या वाहनानेच प्रवास करावा लागत आहे. परंतु आता तुम्हाला कमी किंमतीत दमदार इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याची मोठी संधी आहे. (Enigma Ambier N8 Electric Scooter)
एनिग्मा ऑटोमोबाईल्स कंपनीने आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये उतरवली आहे. Enigma Ambier N8 scooter असं या इलेक्ट्रिक स्कूटरचे नाव आहे. खासकरून कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी, त्याचबरोबर ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही इलेक्ट्रिक स्कूटर बनवण्यात आली असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
कंपनीने मार्केटमध्ये उतरवलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरचे सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रति तासी ही इलेक्ट्रिक स्कूटर 50 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत आणि वैशिष्ट्य जाऊन तुम्ही देखील या गाडीच्या प्रेमात पडू शकता. जाणून घेऊया सविस्तर..
कंपनीने तयार केलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर एका चार्जमध्ये तब्बल दोनशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते. या इलेक्ट्रिक स्कूटरला 50 चा स्पीड असल्याने, तुम्ही वेळेत तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. विशेष म्हणजे, या गाडीची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे. Ola S1 Pro या इलेक्ट्रिक स्कूटरचा बाजार उठवण्यासाठी ही स्कूटर सज्ज झाली आहे. ओलाशी तुलना करायची झाल्यास ola इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत एक लाख 40 हजार रुपये आहे. आणि ola स्कूटर एका चार्जमध्ये 181 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते.
फीचर्स
Enigma Ambier N8 या इलेक्ट्रिक स्कूटरला 1500 वॅटची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. स्कूटरला अधिक ताकद देण्यासाठी लिथियम फेरो फॉस्फेट बॅटरी दिली आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तब्बल २०० किलोचा भार ही इलेक्ट्रिक स्कूटर पेलण्यास सक्षम आहे. याशिवाय तुम्ही स्कूटरच्या सीटखाली तब्बल २६-लिटर बूटस्पेस ठेवू शकता. चोरीची चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण या स्कूटरला स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी दिली आहे.
किंमत
Enigma Ambier N8 या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फीचर्सच्या तुलनेत ही किंमत फारच कमी ठेवण्यात आली आहे. ही स्कूटर तुम्हाला केवळ एक लाख पाच हजार रुपयांमध्ये खरेदी करता येत आहे. कंपनीने टॉप व्हेरिएंटची किंमत देखील 1लाख दहा हजार ठेवली आहे. इतर इलेक्ट्रिक स्कूटर च्या तुलनेत या इलेक्ट्रिसिटी नंबर आहेत आणि किंमत देखील कमी आहे. साहजिकच त्यामुळे ही इलेक्ट्रिक स्कूटर तुमच्यासाठी दमदार पॅकेज असणार आहे.
हे देखील वाचा Smrita Mandhana Palash Muchhal: 27 वर्षाच्या या तरुणासोबत स्मृती मानधनाचं सूत जुळलं; लग्नाची तारीखही ठरली..
Asia Cup 2023: ..म्हणून सूर्यकुमार यादव वर्ल्डकपचा भाग नसणार; आशिया कपमधूनही वगळले जाणार..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम