Maharashtra Jalsampada Recruitment 2023: जलसंपदा विभागात 16,185 जागांची मेगा भरती; जाणून घ्या डिटेल्स..

0

Maharashtra Jalsampada Recruitment 2023: महागाईच्या (inflation) या जमान्यात प्रत्येकाला नोकरी (nokari) असणे फार आवश्यक आहे. सध्या बेरोजगारी (unemployment) मोठ्या प्रमाणात असली तरी काही विभागांमध्ये नोकर भरती (nokar Bharti) देखील केली जात आहे. महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये (Department of Water Resources) मेगा भरती (mega Bharti) केली जाणार असून तब्बल 16185 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जाणून घेऊया या भरती विषयी सविस्तर.. (Maharashtra Jalsampada Recruitment 2023)

महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामध्ये 2013 पासून नोकर भरती करण्यात आलेली नाही. मात्र आता ऑगस्टमध्ये या संदर्भातील अधीसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या भरती प्रक्रिया संदर्भात जलसंपदा विभागाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, मात्र या भरती प्रक्रियेविषयी 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.

इतक्या जागा भरण्यात येणार..

महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागांमध्ये 16 हजार 185 रिक्त जागांची नोकर भरती केली जाणार आहे. 15 ऑगस्ट 2023 पूर्वी यासंदर्भात अधीसूचना जारी केली जाईल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार पावले उचलत आहे. त्याचाच एक भाग म्हणून या विभागात नोकर भरती केली जाणार आहे. कोरोना काळामुळे ही भरती प्रक्रिया घडली गेली. आता मात्र या भरती प्रक्रिया संदर्भात राज्य सरकार प्रतिकूल आहे.

अशी होईल भरती..

भरती प्रक्रिया संदर्भात बोलायचं झालं तर, जलसंपदा विभागामध्ये ‘गट क’मध्ये सरळसेवा पद्धतीने भरती होणार आहे. सरळसेवा पद्धतीने आठ हजार चौदा रिक्त जागा भरण्यात येतील. याबरोबर पदोन्नती पद्धतीने 3,163 जागा भरण्यात येणार असल्याची माहिती आहे. अशा एकूण 16,185 जागांसाठी ही भरती केली जाईल.

गट ड’ पदासाठी अशी असेल भरती..

महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागांमध्ये 4702 रिक्त जागा गट ड संवर्गामध्ये सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर ‘गट ड’मध्ये 306 रिक्त जागा या पदोन्नतीने भरण्यात येणार आहेत. ‘गट ड’ या संवर्गामध्ये एकूण 5058 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या संवर्गामध्ये एकूण 16185 असं रिक्त पदांचा स्वरूप असेल.

अनुशेष भरुन काढण्याचा मानस..

राज्य सरकार जलसंपदा विभागांमधील अनुशेष भरुन काढणार असल्याची माहिती आहे. जलसंपदा या विभागांमध्ये 2013 पासून अध्याप एकही नोकरी भरती झालेली नाही. त्यामुळे रखडला गेलेला अनुशेष या भरतीच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे.

हे देखील वाचा IND vs WI 1st Odi: अशी आहे पहिल्या वनडेसाठी भारताची अंतिम अकरा; जाणून घ्या सामन्याची वेळ आणि थेट प्रक्षेपण..

Cash Deposite New Rules: बचत खात्यात या पेक्षा जास्त रक्कम ठेवल्यास IT ठोठावते तुमचा दरवाजा..

Asia Cup 2023: ..म्हणून सूर्यकुमार यादव वर्ल्डकपचा भाग नसणार; आशिया कपमधूनही वगळले जाणार..

Fliese disposal tips: घरात माशांनी धुडगूस घातलाय? फक्त करा हा उपाय, माशी पुन्हा शोधूनही सापडणार नाही..

Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.