अक्षरशः तलाठ्याने चाऊन खाल्ले पाच हजार रुपये, तलठ्याची ‘अशी’ झाली फजिती; व्हिडिओ व्हायरल

तलाठी आणि भ्रष्टाचार हे काही नवीन नाही आपल्या सर्वांना या गोष्टीचा कधीतरी अनुभव आला असेलच. तलाठी कार्यालयात गेल्यानंतर छोट्या छोट्या गोष्टींसाठी बऱ्याच ठिकाणी राजरोसपणे पैसे घेतले जातात. लोकांची देखील अशी धारणा झाली आहे की त्या ठिकाणी पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. आजही काही लोक प्रामाणिकपणे काम करणारे सापडतील. परंतु ज्या वेळेस लाचेची मागणी केली जाते, अशावेळी कित्येक तलाठी लाचलुचपत विभागाच्या हाती देखील सापडले आहेत. त्यांचे निलंबन देखील होते.

 

असंच एक प्रकरण मध्य प्रदेश मध्ये घडलं आहे. या प्रकरणातील तलाठी आरोपीची झालेली फजिती पाहून आपणास देखील हसू आवरणार नाही. लाचखोर तलाठी गजेंद्र सिंह याने एका कामासाठी चंदन सिंह लोधी या व्यक्तीकडून पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचेची मागणी केल्यानंतर चंदन सिंह यांनी लोकायुक्त जबलपूर यांच्याकडे याबाबत तक्रार केली. ठरल्याप्रमाणे चंदन सिंह यांनी लाचखोर तलाठी गजेंद्र सिंह याला पाच हजार रुपये लाच दिली. यामध्ये पाचशे रुपयांच्या दहा नोटा होत्या.

 

ही लाच घेताना लोकायुक्तांचं पथक घटनास्थळी उपस्थित होतं. या पथकाने लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले. या पथकाला पाहिल्यानंतर स्वतःला वाचवण्यासाठी लाचखोर तलाठी गजेंद्र सिंह याने 500 रुपयांच्या दहा नोटा चावून खायला सुरुवात केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पथकातील अधिकाऱ्यांनी तलाठ्याच्या तोंडातील नोटा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये त्यांना अपयश आले. घटनास्थळी उपस्थित असलेले सर्वजण यामुळे चकित झाले. शेवटी लाचखोर तलाठ्याला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी गेल्यानंतर शर्तीचे प्रयत्न करून डॉक्टरांनी लाचखोराने खाल्लेल्या नोटा बाहेर काढल्या.

 

लाचखोर तलाठी गजेंद्र सिंह याच्यावर चंदन सिंह लोधी यांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली आहे. लोकायुक्तांच्या पथकाचे नेतृत्व करणारे कमल सिंह उईके यांनी लाचखोर तलाठी गजेंद्र सिंह याला ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं. परंतु तलाठ्याने केलेल्या नाटकबाजीमुळे त्याच्यावरील कारवाई टळणार नाही. कारण या पथकाकडे व्हॉईस रेकॉर्डिंगसह इतर देखील पुरावे असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढील कारवाईला कुठलीही अडचण नसल्याचे उईके यांनी सांगितले.

 

एकंदरीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदे जरी असले, तरी त्याची अंमलबजावणी होणे देखील गरजेचे आहे. देशाला लागलेली भ्रष्टाचाराची कीड मात्र संपता संपत नाही. लोकांनी देखील भ्रष्टाचाराला मान्य केले आहे. कारण अधिकाऱ्यांची तक्रार करायची म्हणलं तरी आपणच अडचणीत सापडू नये, अशी भीती सर्वसामान्य लोकांना असते. त्यातूनही जे लोक धाडस करून तक्रार करतात, त्यांना काही प्रमाणात का होईना, पण न्याय मिळत आहे. त्यामुळे देशाचे नागरिक म्हणून आपली देखील काही जबाबदारी आहे.

हेही वाचा: Couple Water Park video: पाण्यातच गडी आला खळीला, अन् वॉटर पार्कलाच केलं Oyo; पाहा तो व्हिडिओ.. 

Sexual health Tips: संबंधानंतर तो अवयव दुखतो, आग, जळजळ होते? जाणून घ्या कारणे आणि उपाय..

Cake Making Video: तुम्हालाही केक आवडतो? केक बनवतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही केकला पुन्हा जन्मात हातही लागणार नाही..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Comments are closed.