Ration Card: धान्य घेण्यासाठी आता रेशन कार्डची आवश्यकता नाही! फक्त करा हे काम..
Ration Card: रेशन कार्ड (ration card) हे सर्वसामान्यांचा आधार आहे. रेशन कार्डच्या माध्यमातून सरकारच्या अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्यांना घेता येतो. रेशन कार्ड नसेल, तर तुम्हाला सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागतं. अगदी दुकानदार कितीही ओळखीचा असला, तरी देखील रेशन कार्ड नसेल, तर तुम्हाला रेशन देत नाही. मात्र आता रेशन घेण्यासाठी रेशन कार्डची आवश्यकता नाही.
देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना केंद्र आणि राज्य सरकार रेशन कार्डच्या माध्यमातून मोफत आणि स्वस्त धान्य देत आहे. केंद्र सरकारने मोफत रेशन देण्याची मुदत वाढवली असून, 2024 पर्यंत लाभार्थी रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेचा लाभ घेता येणार आहे. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोललं जातं.
कोरोना काळापासून केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांना मोफत धान्य वाटप केले जात आहे. तसेच केंद्र सरकारकडून या मोफत धान्य वाटप योजनेची मुदत देखील वाढवली आहे. केंद्र सरकारकडून मोफत धान्य वाटप योजनेची मुदत २०२४ पर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांना अनेक डॉक्युमेंट बाळगण्याच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी सरकारने “वन नेशन वन राशन कार्ड” (one nation one ration card) योजना सुरू केली आहे. या योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
यापूर्वी तुम्हाला रेशन दुकानात गेल्यानंतर, रेशन कार्ड दाखवल्यानंतरच तुमच्या हक्काचे रेशन तुम्हाला मिळत होते. मात्र आता तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तरी देखील तुम्हाला तुमचे रेशन मिळणार आहे. एवढेच नाही, तर देशातल्या कुठल्याही स्वस्त धान्य दुकानात तुम्हाला रेशन मिळणार आहे. सरकारने ही योजना देशभरात लागू केली आहे. वन नेशन, वन राशन कार्ड’ असं या योजनेचे नाव आहे.
नवीन कार्ड बनवण्याचे काम सुरू आहे..
जुन्या रेशनकार्ड वरून हे नवीन रेशन कार्ड बनवण्याचे काम सुरू आहे. “वन नेशन वनरेशन कार्ड” या योजनेअंतर्गत तुमचे “रेशन कार्ड” हे तुमच्या बँक खात्याची लिंक असणे बंधनकारक असणार आहे. बँक खात्याशी तुमचे रेशन कार्ड लिंक नसेल, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच तुम्हाला रेशन कार्ड नसताना रेशन घेण्याचा लाभ मिळणार नाही.
वन नेशन, वन रेशन कार्ड
वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेच्या माध्यमातून रेशनचे वितरण पीओएसद्वारे करण्यात येत आहे. जर तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचे रेशन कार्ड तुम्हाला बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे. तरच तुम्हाला रेशन नसताना तुमच्या हक्काचे धान्य मिळणार आहे.
हे देखील वाचा Chanakya Niti: मार्ग कितीही खडतर असू द्या, फक्त चाणक्याचे हे शब्द ध्यानात ठेवा; यश लोटांगण घालेलच..
PM Kisan Yojana: योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा ऑनलाइन अर्ज; या दिवशी जमा होणार चौदावा हप्ता..
Success Story: शाब्बास..!लाल केळीतून 35 लाख उत्पन्न, वाचा इंजिनियर तरुणाची यशोगाथा..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम