एका रात्रीत शेकडो झाडांची कत्तल अतिशय विनम्रपणे केली होती; सचिन सावंत

0

रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यापैकीच एक अरे येथील मेट्रो कार शेड त्यांनी कांजूरमार्ग येथे हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय केवळ अहंकारातून घेतलेला आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला विरोध केला आहे.

सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणारा हा प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडणार आहे,त्याचबरोबर चार हजार कोटींचा आर्थिक भार देखील वाढणार आहे. महाविकासआघाडी ने घेतलेला हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा आहे. असं विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी म्हटलं होतं. आता या प्रकरणात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी उडीघेत फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अरे मधील वृक्षतोड ही फडणवीस सरकारच्या काळात झाली होती. हायकोर्टाने वृक्षतोड करण्यास परवानगी दिल्यानंतर फडणवीस सरकारने चारशेहून अधिक झाडांची कत्तल एका रात्रीत केल्याचे समोर आले होते. पर्यावरण प्रेमींना या घटनेची माहिती झाल्यावर त्यांनी या ठिकाणी जोरदार प्रदर्शनही केले होते. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल केले होते.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी फडणवीस यांना याच प्रकरणाची आठवण करून देत, तुम्ही रात्रीत चारशेहून अधिक झाडांची कत्तल ही अतिशय विनम्रपणे केली होती! असं ट्विट करत सचिन सावंत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.