मुंबईमध्ये बत्ती गुल!
मुंबईच्या अनेक भागात सकाळी दहाच्या आसपास बत्ती गुल झाली. ग्रीड फेल्युअर मुळे उपनगर मधील बत्ती गुल झाली होती. बत्ती गुल झाल्यानंतर लवकरच वीज पुरवठा पूर्ववत होईल अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली. ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करण्यात येईल असे देखील राऊत म्हणाले. हे सरकार कल्पना शून्य असून जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली. तसेच ऊर्जामंत्री काय करत आहेत असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
बत्ती गुल झाल्यानंतर वेस्टर्न, सेंट्रल, हार्बर या तिन्ही ठिकाणच्या लोकल जागच्या जागी थांबल्या होत्या. अत्यावश्यक व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चालू असलेल्या लोकल ठप्प झाल्यामुळे अनेकांचे हाल झाले, काही जणांनी ट्रॅकवरून चालत जाणे पसंत केले.रेल्वे स्टेशन वरील लाईट गेल्यामुळे इंडिकेटर्स, स्पीकर बंद झाले होते; त्यामुळे प्रवाशांना कुठल्या सूचना देता आल्या नाहीत. त्यामुळे प्रवासी देखील त्रस्त झाले. यावेळी मात्र रेल्वे स्टेशन वरती प्रवाशांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन केलं. रेल्वे पोलीस देखील याबाबत सूचना करत होते.
बत्ती गुल चा तोटा रस्त्यावरील प्रवाशांनाही झाला. लाईट गेल्यामुळे रस्त्यावरील सिग्नल बंद झाले होते त्यामुळे रस्त्यावरही ट्राफिक पहायला मिळाले.
त्याचबरोबर बत्ती गुल चा तोटा आज रुग्णालयातील रुग्णांना सुद्धा झाला. आज बऱ्याच शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. मंत्रालयामध्ये काळोख पसरला, न्यायालय मधील ऑनलाइन सुनावणीला याचा फटका बसला.
एकंदरीतच मुंबई उपनगरांमधील बऱ्याच शासकीय खाजगी यंत्रणा वरती याचा परिणाम झाला.
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम