land area calculator: मोबाइलवरुन 5 मिनिटात मोजता येतेय जमीन; लगेच जाणून घ्या ही सोपी प्रोसेस..

0

land area calculator: जमिनीवरून सख्खी भावंडे देखील भांडतात. हे वेगळं सांगण्याची गरज नाही. शेतीची कामे करत असताना मुद्दाम शेजारी शेतकरी बांध पोकरण्याची कामे वारंवार करतो. अनेकजण एकमेकांवर आरोप करतात, माझं क्षेत्र कमी आहे. सतत माझा बांध पोखरून तू माझं काही क्षेत्र बळकवलं आहे. अशावेळी वाद होतात, गावातील लोक मोजणी करण्याचा सल्ला देतात. मग सरकारी किंवा खाजगी मोजणीसाठी पैसे आणि किचकट प्रक्रियेतूनही जावं लागतं. जर तुम्ही देखील अशा गोष्टींना कंटाळला असाल तर चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. कारण आता तुम्हाला मोबाईलच्या मदतीने केवळ पाच मिनिटात ऑनलाईन क्षेत्र मोजता येणार आहे. (Online land calculation)

टेक्नॉलॉजी आणि डिजिटलच्या या जमान्यात अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या आहेत. पूर्वी अनेकांना जमीन मोजायची म्हणजे, खूप किचकट प्रक्रिया वाटत होती. तुमचं क्षेत्र जर चौकोनी असेल, तर क्षेत्र मोजणे थोडं सोप्पं आहे. पण तुमचं क्षेत्र जर त्रिकोणी अशा स्वरूपात असेल, तर अनेकांना मीटर टेपच्या माध्यमातून क्षेत्र कसं मोजायचं? हे माहीत नसतं. मात्र आता क्षेत्र कसंही असेल, तरी चिंता करण्याची गरज नाही. कारण मोबाईलच्या मदतीने तुम्हाला केवळ पाच मिनिटात अचूक पद्धतीने तुमचे क्षेत्र मोजता येणार आहे. (Land area count)

तुमचं क्षेत्र मोबाईलच्या मदतीने ऑनलाईन मोजण्यासाठी तुम्हाला मोबाईल वरून एक app डाऊनलोड करायचं आहे. त्यासाठी तुम्ही play store वर जाऊन, “land area calculator” हे ॲप डाऊनलोड करा. हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर, तुम्हाला हे ॲप सुरू करायचं आहे. ॲप सुरू केल्यानंतर, ऑटोमॅटिकली तुमच्या फोनचे लोकेशन ओपन होईल.

हे ॲप ओपन केल्यानंतर, उजव्या बाजूला सर्वात खाली एक गोल आकाराचा “सिम्बॉल” पाहायला मिळेल. तुम्हाला या सिम्बॉलवर क्लिक करायचा आहे. सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर distance, area असे तीन पर्याय ओपन होतील. या तीन पर्यायांपैकी तुम्हाला ‘area’ हा पर्याय निवडायचा आहे. area या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुमच्यासमोर “walking” आणि “manually” असे दोन पर्याय ओपन होतील.

walking आणि manually या दोन पर्यायापैकी “वॉकिंग” हा पर्याय सर्वात बेस्ट आहे. तुमच्या जमिनीचे क्षेत्र मोजण्यासाठी तुम्हाला “walking” या पर्यायावर क्लिक करून, शेताचा जो बांध आहे, त्या बांधाबरोबर राऊंड पूर्ण करायचा आहे. तुम्ही ही प्रोसेस सविस्तर केल्यानंतर, तुमच्यासमोर तुम्हाला तुमच्या क्षेत्राचं क्षेत्रफळ गुंठ्यात आणि एकरमध्ये दिसेल.

“manually” या पर्यायाच्या माध्यमातून जर तुम्ही जमीन मोजण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला हा पर्याय ओपन करून बांधाबरोबर फिरायचं आहे. तुम्ही जसं बांधाबरोबर फिराल, त्या पद्धतीने एक रेषा सर्कल टाकत जाईल. तुम्हाला बरोबर सर्कलनुसार क्लिक करत जायचं आहे. बांधा भोवती हा सर्कल पूर्ण झाल्यानंतर, तुमच्यासमोर तुमच्या शेताचे क्षेत्रफळ अचूक पद्धतीने मिळेल.

हे देखील वाचा RCB vs KKR: हे चार खेळाडू खेळतात गल्ली क्रिकेट, आमची जिंकण्याची लायकी नाही; विराटच्या विधानाने खळबळ..

IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

Smartphone Under 10K: कॅमेरा, बॅटरी दमदार असणारे हे 6 स्मार्टफोन मिळतायत 10 हजाराच्या आतमध्ये; जाणून घ्या लगेच..

Air Cooler: आता घरच्या घरी बनवा 500 रुपयांत दमदार कूलर; पाहा हा जुगाड..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.