IPL 2023: नाकातून मेकुड काढून अर्जुन तेंडुलकरने टाकला तोंडात; व्हिडिओ झाला कॅमेऱ्यात कैद..

0

IPL 2023: अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स बरोबर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर प्रवास करतोय. अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाकडून कधी डेब्यू करणार, याच्या गेल्या अनेक वर्षांपासून जोरदार चर्चा रंगल्या होत्या. अखेर अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आयपीएलच्या सोळाव्या हंगामात (IPL season16) मुंबई इंडियन्स संघाकडून पदार्पण केलं आहे. गुणवत्ता असून देखील अर्जुन तेंडुलकरला सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा असल्याने ट्रोलींगचा सामना करावा लागला.

मुंबई इंडियन्स आणि पंजाब किग्स या दोन संघांमध्ये पार पडलेल्या सामन्यात अर्जुन महागडा ठरला. पंजाब संघाच्या फलंदाजांनी अर्जुन तेंडुलकरला एकाच षटकात 31 धावा कुटल्या. मात्र काल खेळल्या गेलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात अर्जुनने दोन षटकांत केवळ नऊ धावा देत एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. उत्तम गोलंदाजी करून देखील अर्जुन तेंडुलकरचा रोहित शर्माने योग्य वापर केला नाही.

गुणवत्ता असून देखील सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने अर्जुन तेंडुलकर नेहमी अंडर रेटेड राहिला. एकीकडे सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव आहे. तर दुसरीकडे त्याच्या मुलाला क्रिकेट खेळता येत नसल्याची टीका देखील त्याच्यावर झाली. मात्र आयपीएलमध्ये पदार्पण केल्यानंतर, अजून तेंडुलकरमध्ये गुणवत्ता असल्याचं त्याने दाखवून देत टीकाकारांचे तोंड बंद केलं.

अर्जुन तेंडुलकरने आपली गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे आता त्याने टीकाकारांचे तोंड बंद केलं आहे. मात्र आता पुन्हा एकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोलिंग करण्यात येत आहे. हे ट्रोलींग खेळाविषयी नसून, मैदानावर त्याने केलेल्या कृत्यामुळे होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत अर्जून तेंडुलकर मैदानावर क्षेत्ररक्षण करत असतानाचा हा व्हिडिओ आहे.

मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना अर्जुन तेंडुलकरने आपल्या नाकामध्ये बोट घातल्याचा हा व्हिडिओ आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत तेंडुलकर आपल्या नाकामध्ये बोट घालतो. नाकातून बोट बाहेर काढल्यानंतर, तेच बोट तोंडात घालताना पाहायला मिळत आहे. आता याच व्हिडिओमुळे अर्जुन तेंडुलकरला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.

अर्जुन तेंडुलकर आपले बोट नाकामध्ये घालून मेकुड बाहेर काढत आहे. हाच मेकुड तोंडात देखील टाकून तो खात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर, तेंडुलकरचे हे कृत्य खरं असल्याचं देखील दिसत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले आहे, अर्जुन तेंडुलकरला सचिन तेंडुलकर बहुतेक जेवण देत नसावा. तर काहींनी लहानपणीची ही त्याची सवय अजूनही गेली नाही, असेही म्हटले आहे.

हे देखील वाचा Smartphone Under 10K: कॅमेरा, बॅटरी दमदार असणारे हे 6 स्मार्टफोन मिळतायत 10 हजाराच्या आतमध्ये; जाणून घ्या लगेच..

Air Cooler: आता घरच्या घरी बनवा 500 रुपयांत दमदार कूलर; पाहा हा जुगाड..

Sugarcane Juice Benefits: कावीळ-मुतखड्यावर रामबाण उपाय आहे हा उन्हाळी ज्यूस; मात्र या 5 लोकांना येणार नाही पिता..

TATA electric bicycle: टाटाची सगळ्यात स्वस्त आणि दमदार सायकल बाजारात दाखल; किंमत आहे केवळ..

Best Selling Bike: 72 हजार किंमत, 80.6 मायलेज असणाऱ्या या गाडीचा नवा विक्रम; या आहेत भारतात सर्वाधिक विकल्या गेलेल्या पाच टू-व्हीलर..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.