Air Cooler: आता घरच्या घरी बनवा 500 रुपयांत दमदार कूलर; पाहा हा जुगाड..
Air Cooler: उन्हाळ्यात गर्मीमुळे प्रत्येक जण त्रस्त असतो. तापमानामुळे रात्री देखील फॅन गरम हवा बाहेर फेकतो. साहजिक असल्यामुळे रात्री पुरेशी झोप देखील होत नाही. या समस्येला कंटाळून अनेकजन एसी, महागडे कूलर घरामध्ये आणतात. मात्र प्रत्येकाला एसी (AC) महागडे कुलर (cooler) खरेदी करणे शक्य नसतं. अशावेळी तुम्हाला ऍडजेस्टमेंट करून संपूर्ण उन्हाळा काढावा लागतो. मात्र आता तुम्हाला तडजोड करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही केवळ पाचशे रुपयांमध्ये घरच्या घरी अगदी सहज कुलर बनवू शकता.
परिस्थिती नेहमी जुगाडाला जन्म घालत असते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्याच्याशी प्रत्येकाचा जवळचा संबंध असतो. अनेकदा आपल्याला हव्या त्या गृहोपयोगी वस्तू मिळत नाहीत. मात्र या वस्तू शिवाय जुगाड करून अनेकजण काम चालवतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो, पाहून तुम्ही देखील घरच्या घरी केवळ पाचशे रुपयांमध्ये कूलर तयार करू शकता.
असा बनवा कूलर
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ फारच भन्नाट आहे. एक मुलगा घरच्या घरी कुलर कसा बनवायचा? याविषयी माहिती देताना पाहायला मिळत आहे. यासाठी त्याने साधारण चार फुटाचा प्लॅस्टिक ड्रम घेतला आहे. सोबतच एक पंखा देखील या ड्रमला कनेक्ट करण्यासाठी घेतला आहे. पंख्याच्या आकारानुसार या तरुणांनी या ड्रमची कापणी केली आहे.
प्लास्टिक ड्रमच्या एका साईटला पंख्याच्या आकाराने हा ड्रम तरुणाने कापून घेतला. तर दुसऱ्या साईटला साधारण एक फुट रुंदी आणि एक फूट लांबी अशा प्रकारची कापला या तरुणांनी ड्रमला केली आहे. पंख्याच्या विरुद्ध दिशेला कापलेल्या जागेवर या तरुणाने ड्रममध्ये जाळी घातली आहे. या जाळीला कुलिंग पॅड कनेक्ट केले आहे.
कॉलिंग पॅड कनेक्ट केल्यानंतर, या तरुणाने हे पॅड बाहेर येऊ नये म्हणून, नटबोल्टने आवळल्याचे देखील पाहायला मिळत आहे. सोबतच आतल्या साईटने कनेक्ट केल्यानंतर, बाहेरून धोका निर्माण होऊ नये, म्हणून पंख्याच्या बाहेरील बाजूस जाळी देखील या तरुणांनी लावल्याचे तुम्ही पाहू शकता. कुलिंग पॅडवर सतत पाणी पडत राहावं आणि थंड हवा बाहेर यावी यासाठी तरुणाने ड्रमच्या आतील बाजूला दोन फूट रबर पाईप देखील जोडली आहे. हा रबर पाईप कूलिंग पॅडवर पाणी सोडण्याचे काम करत असल्याचे तुम्ही पाहू शकता.
अशा पद्धतीने या तरुणाने पाचशे रुपयांत एक पंखा विकत घेऊन हा कूलर तयार केला आहे. हा व्हिडिओ व्यवस्थित पाहून, तुम्ही देखील तरुणाने तयार केलेल्या कूलर प्रमाणे घरच्या-घरी पाचशे रुपयांत दमदार थंड हवा देणारा कुलर तयार करू शकता. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ तब्बल 1 कोटी 20 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. विशेष म्हणजे, हा व्हिडिओ एका महिन्यापूर्वी तयार करण्यात आला आहे.
हे देखील वाचा Sugarcane Juice Benefits: कावीळ-मुतखड्यावर रामबाण उपाय आहे हा उन्हाळी ज्यूस; मात्र या 5 लोकांना येणार नाही पिता..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम