Animal Viral Video: खोल विहिरीतून मांजरीला बाहेर काढण्यासाठी माकडाची धडपड पाहून येतील अश्रू; पाहा हृदयस्पर्शी व्हिडिओ..

0

Animal Viral Video: माणसांपेक्षा प्राण्यांना अधिक जास्त भावना आणि संवेदनशीलता असतात. असं म्हटलं जातं. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना माणसांकडून अलीकडच्या काळात सातत्याने होताना पाहायला मिळतात. साहजिकच माणूस माणुसकी विसरत चाललाय. पण प्राणी माणुसकीचे दर्शन घडवत चालला आहे. माणुसकीचे दर्शन घडवणारा आणि डोळ्यातून अश्रू आणणारा माकडाचा एक व्हिडिओ (Video) सध्या सोशल मीडियावर (social media) तुफान व्हायरल (Viral)झाला आहे.  (Monkey cat video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक माकड मांजरीचा जीव वाचवण्यासाठी कमालीची धडपड करताना पाहायला मिळत आहे. प्राणी एकमेकांचा प्राण वाचवतानाचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. शिकाऱ्यापासून रक्षण व्हावे, यासाठी अनेक प्राणी एकमेकांना इशारा देत असतात. आवाजाच्या माध्यमातून संकेत देत असतात. या सगळ्यांमध्ये माकड अग्रेसर असते, हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल.

एकमेकांना संकटापूर्वी इशारा देऊन, सावध करणे ही एक वेगळी गोष्ट आहे. मात्र प्रत्यक्षात एखाद्या प्राण्याचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पराकाष्ठा करणं, यात खूप फरक आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतर प्राण्यांचा जीव वाचवणारे खूप कमी प्राणी तुम्ही पाहिले असतील, किंवा नसतीलही. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल. या माकडाने माणसांमधील हरवत चाललेली माणुसकी परत आणण्याचा प्रयत्न केलाय.

काय घडलं नेमकं? 

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक माकड मांजरीला वाचवताना पाहायला मिळत आहे. एका छोट्याशा विहिरीमध्ये मांजरीचे पिल्लू पडल्याचं पाहायला मिळत आहे. या विहिरीमध्ये फारसं पाणी नाही. मात्र चिखल खूप प्रमाणात आहे. या विहिरीमध्ये मांजर पडल्याचं दिसत आहे. चिखलामुळे मांजरीचे खूप हाल देखील झाले आहेत. अचानक एका माकडाची मांजरीकडे लक्ष जातं. आणि मांजर थेट विहिरीमध्ये उतरते.

माकड मांजरीला आपल्या हातामध्ये घेऊन बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र विहिरीची उंची जास्त असल्याने माकडाला मांजरीला घेऊन उडी मारणे शक्य होत नाही. अनेकदा माकड विहिरीतून बाहेर येऊन कोणी आहे का? कोणाची मदत मिळू शकेल का? याचा देखील विचार करताना दिसत आहे. दोन-तीन वेळा माकड विहिरीतून बाहेर येऊन पुन्हा विहिरीत मांजराला वाचवण्यासाठी जात असल्याचे दिसते.

खूप प्रयत्न करून देखील माकडाला मांजरीला बाहेर काढण्यात यश येत नाही. मात्र माकडाने मांजरीला बाहेर काढण्यासाठी केलेले प्रयत्न पाहून तुमचे देखील डोळे पाणवतील. मांजरीला बाहेर काढण्यासाठी माकडाची तळमळ आणि धडपड पाहून, माणसांमधील माणुसकी पुन्हा जिवंत होऊ शकते, असं हे दृश्य आहे. अखेर एक मुलगी या ठिकाणी येऊन, मांजरीला बाहेर काढते. बाहेर काढलेल्या मांजरीला माकड दोन्ही हातात पकडुन कट्ट्यावर बसून कुरवाळत असल्याचं तुम्ही पाहू शकता.

हे देखील वाचा Ajit Pawar: ब्रेकिंग न्यूज! त्याचमुळे अजित पवारांनी आज अचानक रद्द केले सर्व कार्यक्रम; राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ..

RR vs GT: हार्दिक पांड्याने पुन्हा दाखवला माज, संजूशी असा भिडला; पाहा व्हिडिओ..

PM Kisan Yojana: या दिवशी येणार 14 वा हप्ता, पण त्याआधी करावं लागणार हे काम; तुम्हाला १४वा हप्ता मिळणार का? जाणून घ्या या पद्धतीने..

Ration Card: रेशन कार्ड धारकांच्या खात्यावर येऊ लागले पैसे; तुम्हीही घेऊ शकता लाभ, असा करा अर्ज..

Aadhar Card Loan: आता आधारकार्ड वरून मिळणार दोन लाख लोन, तेही ऑनलाईन; जाणून घ्या सविस्तर..

Marriage Tips: लग्नासाठी मुलगी पाहताय? मुलीमध्ये हे गुण नसतील तर चुकूनही करू नका लग्न; व्हाल उध्वस्त..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.