RR vs GT: हार्दिक पांड्याने पुन्हा दाखवला माज, संजूशी असा भिडला; पाहा व्हिडिओ..
RR vs GT: आयपीएल सिझन16 चा 23 वा सामना (IPL season16 23rd match) काल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi cricket stadium Ahmedabad) राजस्थान रॉयल आणि गुजरात टायटन (Rajasthan royals vs Gujarat Titans) या दोन संघांमध्ये पार पडला. चुरशीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने गतविजेत्या संघाला धूळ चारली. हा सामना राजस्थान रॉयल्स संघाच्या हातून गेला असं वाटतं असताना संजू सॅमसन (Sanju Samson) आणि शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) वादळी खेळी करत संघाला या स्पर्धेतला चौथा विजय मिळवून दिला.
राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्स संघ हा धावांचा पाठलाग करून चांगला खेळ करत असल्याने, हा योग्य निर्णय होता. राजस्थान रॉयल्स संघाच्या गोलंदाजांनी चांगला मारा करत गुजरात टायटन्स संघाला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. पहिल्याच षटकात ट्रेण्ड बोल्टने साहाचा अडथळा दूर केला.
गुजरात संघाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. मात्र शुभमन गिल आणि डेव्हिड मिलर या दोघांनी अर्धशतकांची खेळी करत गुजरात संघाला अवानात्मक धावसंख्या उभारून दिली. 178 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात फारच निराशा जनक झाली. राजस्थान संघाचे दोन्ही सलामीवीर सपशेल अपयशी ठरले. एकवेळ 2.5 षटकात 2 बाद 4 धावा अशी दयनीय अवस्था राजस्थान संघाची झाली होती.
10.3 षटके झाल्यानंतर राजस्थान रॉयल संघाचे चार फलंदाज केवळ 55 धावांत तंबूत परतले होते. मात्र संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायरने या दोघांनी गावाची सूत्रे आपल्या हाती घेत अर्धशतकांची वादळी खेळी साकारत राजस्थान रॉयल संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी संजू सॅमसंग फलंदाजी करत असताना गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या विनाकारण (Hardik Pandya) संजूला भिडल्याचे पाहायला मिळालं.
हार्दिक पांडे सध्या भारतीय टी-ट्वेंटी संघाचा कर्णधार देखील आहे. हार्दिक पांड्या कर्णधार असताना एका सामन्यात क्षेत्ररक्षणावेळी विराट कोहलीचा (virat kohli) देखील अपमान केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता. आता पुन्हा एकदा संजू सॅमसन सोबत गैरवर्तन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हार्दिक पांड्याला एवढा माज कशामुळे आला आहे? अशा संतप्त प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत.
— Cricbaaz (@cricbaaz21) April 16, 2023
हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. तर संजू सॅमसन फलंदाजी करत होता. अचानक हार्दिक पांड्या संजू जवळ येऊन काहीतरी बडबड करत असल्याचे दिसत आहे. हार्दिक पांड्याच्या बोलण्याकडे संजू बिलकुलही लक्ष न देता, त्या ठिकाणाहून निघून जातो. आणि हार्दिक पांड्याला इग्नोर करतो. चांगली कामगिरी करून देखील संजूला भारतीय संघात संधी मिळत नसल्याने, क्रिकेट चाहते आपला संताप व्यक्त करताना दिसतात. अशातच हा व्हिडिओ समोर आल्याने, हार्दिक पांड्या संजूला आता संधी देणार नसल्याचं देखील सोशल मीडियावर बोललं जाऊ लागलं आहे.
हे देखील वाचा Jiocinema: अंबानींचा ग्राहकांना दणका! फ्री नंतर आता Jio Cinema पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे..
Aadhar Card Loan: आता आधारकार्ड वरून मिळणार दोन लाख लोन, तेही ऑनलाईन; जाणून घ्या सविस्तर..
Second Hand Bike: नवी कोरी Hero HF Deluxe मिळतेय 25 हजारात, तर Hero passion Pro मिळतेय 30 हजारात..
Lenovo Laptop| निम्म्या किंमतीत खरेदी करा Lenovo चा दमदार लॅपटॉप; या वेबसाईटवर सुरू आहे बंपर सेल..
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक । ट्विटर । इंस्टाग्राम । टेलिग्राम